Gujarat Assembly Election 2022 Dates : गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान, 8 डिसेंबरला निकाल
Gujarat Assembly Election 2022 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये होत असलेल्या निवडणुकांकडे देशाचं लक्ष लागलेलं असून, आज केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त अनुप चंद्र पांडे यानी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली. गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून, ८ डिसेंबर रोजी निकाल […]
ADVERTISEMENT

Gujarat Assembly Election 2022 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये होत असलेल्या निवडणुकांकडे देशाचं लक्ष लागलेलं असून, आज केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त अनुप चंद्र पांडे यानी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली. गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून, ८ डिसेंबर रोजी निकाल घोषित केला जाणार आहे.
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलीये. २०१७ प्रमाणेच २०२२ मध्ये होत असलेल्या विधानसभेची निवडणुकही दोन टप्प्यात होणार आहे.
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर रोजी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होणार आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभा आणि गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम एकाच वेळी जाहीर केला गेला नसला, तरी दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे ८ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.