ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण पूर्ण, परिसरातल्या विहिरीत शिवलिंग आढळल्याचा दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण पार पडलं आहे. रविवार आणि सोमवार असे दोन दिवस हे सर्वेक्षण सुरू होतं. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे सर्वेक्षण पार पडलं. आता यात महत्त्वाची बाब समोर येते आहे ती म्हणजे या मशिद परिसरात जी विहीर आहे त्या विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. न्यायालयात हिंदू पक्षाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी हा दावा केला आहे.

ADVERTISEMENT

सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल कोर्टात जाणार आणि त्यानंतर कोर्ट काय तो निर्णय घेणार आहे. मात्र त्याआधीच ही बाब समोर आली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोणत्या दिशेने जाणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. असं सगळं असलं तरीही जिथे शिवलिंग मिळाल्याचा दावा केला जातो आहे तो फोटो १९९० चा अहे असं सांगितलं जातं आहे.

काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशिदीचा नेमका वाद कधी सुरू झाला?

हे वाचलं का?

या संदर्भात Aaj Tak सोबत फोनवर बोलताना वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितलं की मशिदीच्या प्रांगणात ३० बाय ३० फुटाचा कृत्रीम तलाव सील करण्यात आला आहे. तो एक भाग वगळलं तर बाकीचं प्रांगण आणि मशिदीची जागा खुली आहे.

ज्ञानवापी चा कोपरा न कोपरा पहिल्यानंतर आता हिंदू पक्षाच्या वतीने या ठिकाणी शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकाकर्ते लक्ष्मी देवीचे पती सोहन लाल यांनी नंदीच्या समोर बाबा भोलेनाथ सापडले आहेत असं म्हटलं आहे. नंदी ज्या शंकराची प्रतीक्षा करत होता ते शंकर भगवान अखेर मिळाले आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

हिंदू पक्षाने हा दावा केला आहे की मशिद परिसरात जो वजू खाना आहे तिथे विहिरीचं पाणी हटवताच एक विशाल शिवलिंग आढळून आलं. हेदेखील सांगितलं जातं आहे की नंदीच्या मूर्तीसमोर जे शिवलिंग मिळालं आहे त्याचा व्यास १२ फूट ८ इंच आहे. पहिल्या दिवशीचा सर्वे पूर्ण झाल्यानंतर हा पुरावा आढळल्याने हिंदू पक्ष उत्साहात आहे.

ADVERTISEMENT

ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात कथित रूपाने शंकराची पिंड आढळल्याने हिंदू पक्षाने हर हर महादेवचा जयजयकार केला. ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात शिवलिंग मिळाल्याची बाब समोर येताच हिंदू पक्ष सक्रिय झाला असून त्यांनी तातडीने शिवलिंगाच्या संरक्षणासाठी कोर्टाकडे अर्ज केला आहे. कोर्टाने हिंदू पक्षाचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तातडीने शिवलिंगाच्या सुरक्षेसंदर्भातले आदेश दिले आहेत.

कोर्टाने जो आदेश दिला आहे त्यानुसार या शिवलिंगाजवळ कुणालाही फिरकण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी आता कुणीही येऊ-जाऊ शकत नाही. वजू या ठिकाणावरही बंदी घालण्यात आली आहे. एवढंच नाही तर ज्ञानवापी मशिदीत आता केवळ २० लोक नमाज पठण करू शकतात असंही कोर्टाने म्हटलं आहे. हिंदू पक्षाने केलेला मोठा दावा आणि कोर्टाचा आदेश असं सगळं असूनही मुस्लिम पक्ष हे म्हणतो हे की शिवलिंग मिळाल्याची बाब योग्य नाही. हिंदू पक्षाचे सगळे दावे मुस्लिम पक्षाने खोडून काढले आहेत.

काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशिदीचा वाद काय?

१८ ऑगस्ट २०२१ ला वाराणसीतल्या पाच महिलांनी श्रृंगार गौरी मंदिरात रोज पूजा करण्याची आणि दर्शन घेण्यासाठी मागणी पुढे करत कोर्टात याचिका दाखल केली होती. या नंतर जज रवि कुमार दिवाकर यांनी मंदिरात सर्व्हे आणि व्हीडिओग्राफी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी १० मे पर्यंत अहवाल द्यावा असंही सांगितलं आहे. याच दिवशी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशीद यांचा वाद आजचा नाही. हा वाद १९९१ पासून कोर्टात प्रलंबित आहे. या प्रकरणाची सुनावणी अलाहाबाद येथील हायकोर्टात सुरू आहे. काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशीद यांच्यातला वाद काही प्रमाणात अयोध्यासारखाच आहे.

या वादामध्ये अनेक पैलू आहेत. अयोध्या प्रकरणात मशीद होती आणि मंदिर तयार झालं नव्हतं. मात्र या प्रकरणात मंदिर आणि मशीद दोन्ही तयार आहे. काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानव्यापी मशीद प्रकरणात हिंदू पक्षकारांचं म्हणणं हे आहे की मशीद तिथून हटवण्यात यावी आणि ती जमीन मंदिराला मिळावी. कारण मशीद ही मंदिर तोडून बांधण्यात आली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मशीद हटवण्यात यावी आणि ती जागा आम्हाला देण्यात यावी असं हिंदू पक्षकरांचं म्हणणं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT