कोरोनाची धडकी! हरयाणातील पाच जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहांना पुन्हा टाळे

मुंबई तक

देशात कोरोना रुग्णसंख्येचा वेग वाढला असून, मुंबई, दिल्लीसह काही शहरं पुन्हा एकदा कोरोनाची हॉटस्पॉट बनताना दिसत आहे. संसर्गाचा वेग वाढल्याने हरयाणा सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाच जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये, जीम, चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर सरकारी कार्यालये 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थित चालवली जाणार आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हरयाणा सरकारने गुरुग्राम, फरिदाबाद, अंबाला, पंचकुला आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देशात कोरोना रुग्णसंख्येचा वेग वाढला असून, मुंबई, दिल्लीसह काही शहरं पुन्हा एकदा कोरोनाची हॉटस्पॉट बनताना दिसत आहे. संसर्गाचा वेग वाढल्याने हरयाणा सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाच जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये, जीम, चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर सरकारी कार्यालये 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थित चालवली जाणार आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हरयाणा सरकारने गुरुग्राम, फरिदाबाद, अंबाला, पंचकुला आणि सोनीपत या जिल्ह्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. गुरुग्राम, फरिदाबादमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे सरकारने शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यातील बाजारही सायंकाळी पाच वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत.

…त्या दिवशी राज्यात लॉकडाऊन लागेल; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं भाष्य

बार आणि रेस्तराँ फक्त 50 टक्के क्षमतेनंच सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतकंच नाही, तर जे खेळाडू आणि प्रशिक्षाणार्थींसाठीच स्विमिंग पूल खुले असणार आहेत. तसेच एंटरटेनमेंट पार्कमध्येही लोकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp