मुंबई लोकल बंद होणार का? काय निर्बंध लागणार? राजेश टोपेंनी दिलं सविस्तर उत्तर, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री यांना नेमक्या काय सूचना दिल्या याबद्दल राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. रूग्णसंख्या वाढत असली तरीही मुंबईची लोकल बंद करण्याबाबत निर्णय झालेला नाही असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

शरद पवार यांनी कोणत्या सूचना केल्या ?

हे वाचलं का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये आज आढावा बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ज्या गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, त्या गोष्टींवर आधीच निर्बंध आहेत. मात्र कठोर निर्बंध लावण्याच्या सूचना द्या.

ADVERTISEMENT

तसेच लसीकरण वाढवण्यासाठी शक्य तेवढी कठोर पावलंही उचलण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या.

ADVERTISEMENT

लसीकरण कसं वाढेल, यासाठी आम्हीदेखील प्रयत्न करू, असं आश्वासन पवार यांनी दिलं.

गॅदरींग, मेळावे, जे आहेत, यासंदर्भातल्या सूचना कठोरपणे पाळल्या पाहिजेत.

अनावश्यक गोष्टींसाठी एकत्र येणे टाळले पाहिजे.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांचं साताऱ्यात सूचक वक्तव्य

आणखी काय म्हणाले राजेश टोपे?

शरद पवार यांचा रोज सगळ्यांची संपर्क असतो आणि त्यांना राज्यातील करोना संसर्गाची वाढत असलेली परिस्थिती आहे, की सध्या साधारणपणे काल 25 हजारांच्या दरम्यान पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. उद्या कदाचित 35 हजारही असू शकतील. ही जी आम्ही आकडेवारी सांगितली होती, त्याबाबत अधिक गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. त्यामुळे त्यांनी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि माझ्यासोबत काही वेळ चर्चा केली. ज्यामध्ये सध्याची परिस्थिती त्यावरील उपाय आणि काय निर्बंध आता सध्या निर्बंध जे आहेत त्याची अंमलबजावणी होती आहे का? नाही होत तर त्यालाय करावं लागेल? किंवा अमलबजावणी होत नसेल तर कडक कार्यवाही करा, हे देखी सांगितलं. अशा प्रकारे चर्चा करून त्यांनी एक आढावा घेतला.

वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे मुंबई लोकल बंद होणार का? आयुक्त इकबाल चहल म्हणाले…

मुंबई, पुणे, ठाणे यासह काही ठिकाणी शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतू हा वर्ग अन्य ठिकाणी जर फिरत राहिला तर मग आपला उद्देश साध्य होणार नाही, अशा प्रकारची देखील चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे देखील दररोज चर्चा करतात. रोज सकाळी सात वाजता त्यांची फोनवर एकमेकांशी सविस्तर चर्चा असते. त्यामुळे त्यांना पुढील निर्णय घेण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने त्यांनी अधिकची माहिती घेतली. निर्बंधाबाबत जी काल उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर आज देखील काही चर्चा झाली. या संदर्भातील योग्य निर्णय शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चर्चा करून घेतली आणि कळवतील. आम्ही देखील आमची मतं मांडली आहेत, त्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय़ घेतले जातील. अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT