महाराष्ट्रात मुसळधार पाऊस घालणार थैमान! IMD चा सतर्कतेचा इशारा
भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा मान्सूनमध्ये असामान्य बदल झाल्याची माहिती दिली आहे. गेल्या दोन दिवासांपासून पावसाला सुरूवात झाली. पण पहिल्याच पावसात मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील बहुतांश भागात नागरिकांची तारांबळ उडलेली दिसते.
ADVERTISEMENT
Maharashtra Monsoon : भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा मान्सूनमध्ये असामान्य बदल झाल्याची माहिती दिली आहे. गेल्या दोन दिवासांपासून पावसाला सुरूवात झाली. पण पहिल्याच पावसात मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील बहुतांश भागात नागरिकांची तारांबळ उडलेली दिसते. मान्सून मुंबईत लवकर पोहोचतो, मात्र यंदा 2 ते ३ आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आहे. (Heavy Rain In Maharashtra IMD’s alert signal)
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील ‘या’ भागांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
Lok Sabha 2024 : नितीश कुमार पहिली परीक्षा पास, 1998 सारखा चमत्कार होणार?
मुंबईसह पालघर, ठाणे या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे . रायगड आणि रत्नागिरीसारख्या कोकणपट्ट्यातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे. तर, सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. तसंच पुढील 48 तास पुणे, सातारा, नाशिकमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली गेली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र अन् मराठवाडामध्ये ही पावसाचा जोर कायम असणार आहे.
यंदाच्या मान्सूनमध्ये कोणता मोठा बदल? समजून घ्या
हवामान तज्ज्ञांच्या मते नैऋत्य मान्सून सामान्यतः दक्षिणेकडून सुरू होतो आणि केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमार्गे प्रथम महाराष्ट्रात पोहोचतो. मात्र, यंदा मान्सून आधी पूर्वेकडील राज्यांत आणि नंतर दक्षिणेकडील राज्यांत पोहोचल्याचे दिसून आले आहे. मात्र, आता मान्सून वेगाने वाढला असून तो मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पोहोचला आहे.
हे वाचलं का?
Kshama Bindu : स्वत:शीच लग्न केलेल्या ‘या’ तरुणीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस
हवामान तज्ज्ञांनी असामान्य मान्सूनचे सांगितले कारण
हवामानशास्त्रज्ञांचा हवाला अहवालामध्ये म्हटलं आहे की, चक्रीवादळ बिपरजॉयमुळे यंदाचा मान्सून असामान्य होता. बिपरजॉय वादळ 15 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले होते. बिपरजॉयमुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनची प्रगती मंदावली. भारतातील मान्सून देशाला दोन दिशांनी व्यापतो, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. एक अरबी समुद्रापासून देशाच्या पश्चिम भागापर्यंत आणि दुसरा बंगालच्या उपसागरापासून देशाच्या पूर्वेकडील भागांपर्यंत. यंदा बिपरजॉयमुळे अरबी समुद्रातून पश्चिमेकडील राज्यांत पोहोचणारा मान्सून लांबला. त्याचवेळी बंगालच्या उपसागरातून तयार झालेला मान्सून पूर्वेकडील राज्यांमध्ये वेळेवर पोहोचला. यामुळेच यंदा मान्सून असामान्य होता आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये पहिला पाऊस झाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT