Monsoon चं पुनरागमन, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार – IMD
जवळपास ३ आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा ब्रेक घेतल्यानंतर मान्सूचं राज्यात कमबॅक झालं आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात येत्या दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढेल असा अंदाज IMD ने व्यक्त केला आहे. आजपासून पुढचे चार दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाच्या मध्यम सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने […]
ADVERTISEMENT

जवळपास ३ आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा ब्रेक घेतल्यानंतर मान्सूचं राज्यात कमबॅक झालं आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात येत्या दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढेल असा अंदाज IMD ने व्यक्त केला आहे. आजपासून पुढचे चार दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाच्या मध्यम सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अरबी समुद्रावरुन वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. याचसोबत बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील आज सर्वत्र मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. याव्यतिरीक्त रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, कोल्हापूर, यवतमाळ, जालना या जिल्ह्यांसाठीही हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला आहे.