दहशतवाद्यांच्या मुंबई कनेक्शनबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले…
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एका सहा दहशतवाद्यांना काल अटक केली आहे. यापैकी एकजण मुंबईतला आहे. यावरून भाजपने महाराष्ट्र एटीएस झोपलं होतं का अशी टीका केली आहे. याबाबत आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केलं आहे. कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याआधी ज्या परिस्थितीतून आपण जात आहोत, त्या परिस्थितीत सर्वांनी पोलिसांना मदत करण्याची भूमिका घेतली […]
ADVERTISEMENT

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एका सहा दहशतवाद्यांना काल अटक केली आहे. यापैकी एकजण मुंबईतला आहे. यावरून भाजपने महाराष्ट्र एटीएस झोपलं होतं का अशी टीका केली आहे. याबाबत आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केलं आहे.
कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याआधी ज्या परिस्थितीतून आपण जात आहोत, त्या परिस्थितीत सर्वांनी पोलिसांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकारने काढलेल्या आदेशाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यापेक्षा किंवा बाकिच्या काही गोष्टी करण्यापेक्षा सरकारला, पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. अजिबात त्यांना दुसऱ्या कोणत्या गोष्टींसाठी अडकून ठेवलेलं नाही.
आपणही इतर राज्यात जाऊन तशी कारवाई करतो. जर माहिती परिपक्व असेल आणि स्थानिक ठिकाणाहून कुणाला अटक करायची असेल. तर स्थानिक पोलिसांना अवगत केलं जातं. पण माहिती गोळा करत असताना थेट अटक करण्याचे अधिकार देखील पोलिसांना आहेत. त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केलेली आहे. आपल्या गुप्तचर यंत्रणांचं हे अपयश आहे असं मी मुळीच म्हणणार नाही. तसंच यातले फारसे बारकावेही मला आपल्याला सांगता येणार नाहीत कारण त्याचा परीणाम तपासावर होऊ शकतो असंही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.
काय आहे प्रकरण?