संदीप देशपांडेंसाठी मैदानात उतरलेल्या राज ठाकरेंना गृहमंत्र्यांनी फटकारलं, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– योगेश पांडे आणि ऋत्विक भालेकर, मुंबई तक प्रतिनिधी

ADVERTISEMENT

मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन मनसे सैनिकांविरुद्ध राज्यात पोलीस धरपकडीची कारवाई करत आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर कारवाई दरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे. यावरुन संतापलेल्या राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशारा दिला आहे.

आपल्या पत्रात पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

राज ठाकरे उद्धव ठाकरेंना का म्हणाले, ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’

“आरोपीला शोधणं हे पोलिसांचं कामच असतं. पोलीस आपलं काम करतायत. खरंतर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यांनी ताबडतोक पोलिसांना सरेंडर करायला हवं”, असं वळसे पाटील म्हणाले. पोलीस दहशतवाद्यांप्रमाणे मनसे कार्यकर्त्यांचा शोध घेत असल्याच्या आरोपावर प्रश्न विचारला असता वळसे पाटलांनी, मग त्यांचा शोध कसा घ्यायला हवा याचं मार्गदर्शन राज ठाकरेंनी आम्हाला करावं असं खोचक उत्तर दिलं.

ADVERTISEMENT

पोलीस हे कायद्याप्रमाणेच आपलं काम करत असतात, त्यात काही चुकीचं नाही. त्यामुळे कोणीही नाराज व्हायचं काही कारण नाही असंही वळसे-पाटलांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान गुढीपाडव्याच्या सभेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून शिवसेनेला थेट लक्ष्य केलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या आरोपाला उत्तर देताना शिवसेना आमदार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी शिवसेनेची बाजू मांडली.

ADVERTISEMENT

Raj Thackeray ना अयोध्या दौऱ्यावर जाण्याचा नैतिक अधिकार नाही -खासदार विनायक राऊत

सत्तेचा कोणीही गैरवापर करत नाहीये. कायदा मोडला तर सत्तेत असो किंवा नसो कारवाई ही होतच असते. आमच्यावरही विरोधात असताना अशाच कारवाया झाल्या आहेत. आम्हालाही रात्री-अपरात्री पोलिसांनी मारत घरातून नेलं आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर झाला हे आरोप करणं चुकीचं आहे. पोलिसांनी कसं काम करावं हे ते ठरवत असतात. जसं अतिरेकी शोधण्याचं काम करतात तसंच ते कार्यकर्ते शोधण्याचंही काम करतात असं अनिल परब म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT