नागपूर : पार्किंगमधली कार बाहेर काढताना चालकाचं नियंत्रण सुटलं, अपघातात तरुण गंभीर जखमी
– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील मुख्य रस्त्यावर एक धक्कादायक अपघात घडला आहे. पार्किंगमध्ये लावलेली गाडी बाहेर काढताना चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे एक तरुण या गाडीखाली येऊन गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सावनेर तालुक्यातील लष्करशाह ढाबा समोर हा अपघात घडल्याचं कळतंय. या घटनेची पोलिसांकडे कोणतीही […]
ADVERTISEMENT
– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी
ADVERTISEMENT
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील मुख्य रस्त्यावर एक धक्कादायक अपघात घडला आहे. पार्किंगमध्ये लावलेली गाडी बाहेर काढताना चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे एक तरुण या गाडीखाली येऊन गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सावनेर तालुक्यातील लष्करशाह ढाबा समोर हा अपघात घडल्याचं कळतंय. या घटनेची पोलिसांकडे कोणतीही नोंद नसल्याचं कळतंय.
हे वाचलं का?
नागपुरातला थरारक अपघात सीसीटीव्हीत कैद pic.twitter.com/zLceCrgsHw
— Prathmesh Dixit (@PrathmeshDixit2) December 20, 2021
सीसीटीव्हीत दिसत असल्याप्रमाणे पार्किंगमध्ये लावलेली गाडी बाहेर काढत असताना कारचालकाने ब्रेकवर पाय ठेवण्याऐवजी एक्सिलेटरवर पाय ठेवला. याचदरम्यान त्या भागात तीन तरुण एका बाकावर बसले होते. गाडी आपल्या दिशेने रिव्हर्स येत असल्याचं पाहून दोघांनी प्रसंगावधान राखून बाजूला पळ काढला. परंतू यातील एका तरुणाला ते जमलं नाही आणि तो थेट गाडीखाली आला.
बालपणीचा मित्रच निघाला नराधम; विवाहित शिक्षिकेवर बलात्कार, नागपूरमधली धक्कादायक घटना
ADVERTISEMENT
या अपघातात हा तरुण गंभीर जखमी झाला. महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोकं यावेळी हजर असतानाही ते या तरुणाच्या मदतीसाठी आले नसल्याचं कळतंय. त्यामुळे अपघातानंतर जखमींना मदत न केल्यामुळे माणूस आपली माणुसकी विसरत चालला आहे का असा प्रश्न सध्या विचारला जातो आहे.
ADVERTISEMENT
गाडी घेण्यासाठी आईने पैसे न दिल्याचा राग, मोठ्या भावाने दिव्यांग भावाची गळा दाबून केली हत्या
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT