मुंबई : वांद्रेत पाच मजली इमारत कोसळली; ६ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश
मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात एक पाच मजली इमारत कोसळल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेत काही नागरिक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात जवानांना यश आलं आहे. अग्निशामक दल, पोलीस आणि महापालिकेचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी असून, मदत व बचाव कार्य सुरू आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व भागात असलेल्या […]
ADVERTISEMENT
मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात एक पाच मजली इमारत कोसळल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेत काही नागरिक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात जवानांना यश आलं आहे. अग्निशामक दल, पोलीस आणि महापालिकेचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी असून, मदत व बचाव कार्य सुरू आहे.
ADVERTISEMENT
मुंबईतील वांद्रे पूर्व भागात असलेल्या बेहराम नगर परिसरात एक पाच मजली इमारत कोसळल्याची घटना बुधवारी घडली. इमारत कोसळून ५ ते ६ नागरिक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली होती. यातील सहा जणांनाही बाहेर काढण्यात यश आलं आहे.
हे वाचलं का?
दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दल, महापालिकेचं पथक आणि मुंबई पोलिसाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. अग्निशामक दलाच्या पाच गाड्यांसह सहा रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा जवानांकडून शोध सुरू करण्यात आला होता. काही वेळानंतर सहा जणांनाही बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आलं.
ADVERTISEMENT
सहा जणांबाहेर काढण्यात आलं असून, त्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यापैकी ४ जणांना (२ पुरुष आणि २ महिला) व्ही.एन. देसाई रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तर उर्वरित दोन (१ महिला व १ पुरूष) जणांना वांद्रे येथीलच भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या बचाव कार्य सुरू असून, इमारत कोसळण्याचं कारण अद्याप कळू शकलं नाही.
ADVERTISEMENT
मालाडमध्येही कोसळली होती इमारत
मुंबईतील मालाड पश्चिममधील मालवणी परिसरात इमारत कोसळल्याची दुर्घटना मंगळवारी (२५ जानेवारी) घडली होती. दुमली इमारत कोसळून दोन नागरिक जखमी झाले होते. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT