Bigg Boss 16 : पुणेकर MC Stan कसा घडला? ‘अस्तगफिरुल्ला’ने दिली कलाटणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Bigg Boss 16 Winner MC Stan : प्रसिद्ध रिएलिटी शो बिग बॉस 16 (Bigg Boss 16) चा विजेता पुण्यातील 23 वर्षीय रॅपर एमसी स्टॅन उर्फ अल्ताफ तडवी (Famous Raper MC Stan) ठरला आहे. रविवारी रात्री या शोचा ग्रँड फिनाले (Grand Finale) पार पडला. शोचा होस्ट सलमान खानने (Salman Khan) एमसी स्टॅनच्या नावाची घोषणा केली. अमरावतीचा मराठमोळा (Shiv Thakare) शिव ठाकरे या स्पर्धेचा रणरअप ठरला. टॉप 5 मध्ये एमसी स्टॅनसह, शिव ठाकरे, अभिनेत्री प्रियंका चौधरी, शालिन भनौट आणि अर्चना गौतम होते. What Is The famous Rapper MC Stan’s Story?

अनुक्रमे शालिन आणि अर्चना यातून कमी व्होटमुळे बाहेर पडले. तर टॉप 3 मधून प्रियंकाला देखील व्होट कमी मिळाल्यामुळे ति देखील बाहेर पडली. अखेर महाराष्ट्राचे दोघेही शिव आणि स्टॅनमध्ये सर्वाधिक मतांच्या जोरावर स्टॅनच्या नावाची घोषणा झाली. स्टॅनच्या चाहत्यांची संख्या भरपूर आहे. सोशल मीडियावर त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या कोट्यवधीमध्ये आहे. प्रतिकुल परिस्थितीमध्ये स्टॅनने ही प्रसिद्धी मिळवली आहे. त्याच्या एकूण कारकिर्दीवर आपण प्रकाश टाकणारा रिपोर्ट.

3-4 वर्षांत नाव आणि पैसा कमावला

एमसी स्टॅन हिप-हॉप जगातातील एक प्रसिद्ध नाव बनले आहे. हिप-हॉपमध्ये येण्यापूर्वी तो बीट बॉक्सिंग आणि बी-बॉयिंग करत होता. एमसी स्टॅन केवळ 23 वर्षांचा असून इतक्या कमी वयात तो करोडोंची कमाई करत आहे. MC Stan ‘बिग बॉस 16’ च्या प्रीमियरला 60-70 लाख किमतीचे हिंदी लिहिलेले नेकपीस आणि 80 हजार किमतीचे शूज परिधान करून आला होता. एमसी स्टेनने सांगितले की, त्याने अवघ्या 3-4 वर्षांत इतके नाव आणि पैसा कमावला आहे. हे ऐकून सलमानलाही अश्चर्य वाटलं आणि त्याने एमसी स्टॅनचा अभिमान असल्याचे सांगितले. त्याची नेटवर्थ 50लाख रुपये असल्याचं बोललं जातं. त्याची गाणी, यूट्यूब आणि कॉन्सर्टमधून तो दरमहा लाखो रुपये कमावतो.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गरीब कुटुंबात जन्मलेला एमसी स्टॅन मूळचा पुण्याचा आहे.

एमसीचा जन्म पुण्यातील अत्यंत गरीब मुस्लिम (mc stan religion) कुटुंबात झाला. सुरुवातीला त्याला कुटुंब आणि लोकांकडून खूप टोमणे ऐकावे लागले कारण स्टॅन अभ्यासापेक्षा गाण्यावर आणि रॅपकडे जास्त लक्ष देत असे. एक काळ असा होता की स्टॅनकडे पैसे नव्हते आणि त्याला रस्त्यावर रात्र काढावी लागली. पण एमसी स्टॅनने हार मानली नाही. जे पूर्वी एमसी स्टॅनकडे तिरस्काराने बघायचे, ते आज स्टॅनचे कौतुक करताना थकत नाहीत. त्याने रॅपच्या माध्यामाने आपल्या जिवनाची गोष्ट सांगितली आणि लोकांचं त्याच्याकडे बघण्याचं दृष्टीकोण बदलला.

एमसी स्टॅनचे नशीब बदलणारे गाणे

एमसी स्टॅनने ‘समझ मेरी बात को’ या गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, ज्यामध्ये त्याने DIVINE आणि EMIWAY सारख्या गायकांना आव्हान दिलं होतं. याच कारणामुळे एमसी स्टॅन लोकांच्या आठवणीत राहिला. नंतर, एमसी स्टॅनने अस्तगफिरुल्ला नावाचे एक गाणे रिलीज केले, ज्यामध्ये त्याने आपला संघर्ष, आर्थिक अडचणी आणि भूतकाळात झालेल्या चुकांबद्दल सांगितले. या गाण्याने एमसी स्टॅनबद्दल लोकांचा समज बदलला.

ADVERTISEMENT

एससी स्टॅन वाद आणि गर्लफेंड

‘तडीपार’ हा अल्बम एमसी स्टॅनच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. या अल्बमने एमसी स्टॅनला प्रसिद्धी मिळवून दिली. एमसी स्टॅनच्या कुटुंबिय आज त्याचा गर्व करतात. एमसी स्टॅनने सांगितले की तो बिग बॉसमध्ये आला आहे कारण त्याला स्वतःशी संबंधित काही विवाद दूर करायचे आहेत. एमसीने असेही उघड केले की तो अनम शेख नावाच्या मुलीला डेट करत आहे. काही महिन्यांपूर्वी, एमसी स्टॅन वादात सापडला होता जेव्हा त्याची एक्स गर्लफ्रेंज औझमा शेखने आरोप केला होता की स्टॅनने तिला मारायला त्याच्या मॅनेजरला पाठवलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT