पावणे दोन लाख कोटींचा प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला? ‘खऱ्या’ मुख्यमंत्र्यांनी सांगावं- आदित्य ठाकरे

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात येऊ घातलेला फॉक्सकॉन कंपनीचा 1.54 लाख कोटींचा एक मोठा प्रोजेक्ट गुजरातमध्ये पळवला आहे. यानिमीत्तानं माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना नेते आदित्या ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवरती टीका केली आहे. सेमीकंडक्टर निमिर्ती प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारडून तैवानमधील कंपनीसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात होती. आता हा प्रोजेक्ट गुजरातला पळवल्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे.

ADVERTISEMENT

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“सुभाष देसाईजी आणि माझी वेदांता व फॉक्सकॉन यांच्याशी चर्चा झाली होती. आमच्या भेटीही झाल्या. त्या कंपन्यांच्या शिष्टमंडळाने ठिकाणांना भेटी दिल्या आणि तळेगाव (पुणे) येथे हा प्रोजेक्ट उभारण्याचं ठरवलं होतं” असं आदित्य ठाकरे म्हणाले. पुढे ठाकरे म्हणाले “दावोसमध्येही आमची चर्चा महाराष्ट्रात हा उद्योग येईल अशा पद्धतीने झाली. हा प्रोजेक्ट पावणे दोन लाख कोटींचा आहे. या प्रोजेक्टबरोबर १६० छोट्या-मोठ्या कंपन्या उद्योगामध्ये येणार होत्या. हे सगळं होत असताना आज सकाळी करार झाला.

अगरवाल यांनी ट्विट करताना म्हटलंय की हा प्रोजेक्टबद्दल उद्योग मंत्र्यांनी आणि स्थानिक प्रशासनानं मेहनत घेतल्याचं म्हटलंय. मग आपले उद्योगमंत्री आपलं खोके सरकार काय करत होतं. इथलं प्रशासन काय करत होतं. जी कंपनी महाराष्ट्रात जूनपर्यंत येणार होती. २६ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या ट्विटरवर ट्विट आहे की, ही कंपनी इथेच येणार मग महिनाभरात असं काय घडलं”, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे.

हे वाचलं का?

आघाडी सरकारच्या काळात साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आणली- आदित्य ठाकरे

“महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, हा प्रश्न पडला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, कुठे गोळीबार काय होतो. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार काम करत होतो, तेव्हा राज्यात आम्ही साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आणली. ९० टक्क्यांहून अधिक सामजंस्य करार झालेले आहेत. त्यांना जागा उपलब्ध करुन दिल्या, ते काम सुरू झालेलं आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास महाविकास आघाडी सरकारवर होता. दावोस दौऱ्यातही आम्ही ८० हजार कोटींची गुंतवणूक आणली होती”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

“आता राज्यात गुंतवणुकीला पोषक वातावरण नाहीये. सरकारवर कुणाचाही विश्वास नाही. आज धक्कादायक प्रकार घडला आहे. महाराष्ट्रात येणारी कंपनी शेवटच्या मिनिटाला का निघून गेली. या बेकायदेशीर सरकारमधील खऱ्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं की, ही गुंतवणूक आपल्या राज्यातून का निघून गेली”, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT