Mumbai Local साठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पास कसा मिळवता येणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस घेतले आहेत अशा नागरिकांना मुंबईत लोकलने (Mumbai Local) प्रवास करता येणार आहे. याबाबतची घोषणा स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रविवारी राज्याला केलेल्या संबोधनात केली आहे. मात्र, यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत एक महत्त्वाची गोष्ट देखील स्पष्ट केली आहे.

ती म्हणजे या लोकल प्रवासासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने एका पास (online and offline Pass) मिळणार आहे आणि त्याच पासच्या आधारे नागरिकांना लोकलने प्रवास करता येईल.

लोकल प्रवासासाठी नेमका पास मिळणार तरी कसा?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊन ज्यांना 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशा नागरिकांनाच मुंबईत लोकल प्रवास करता येणार आहे. पण यासाठी अशा नागरिकांना एक विशेष पास दिला जाणार आहे. ज्याद्वारे त्यांना लोकल प्रवास करता येईल. याच पाससाठी एक विशेष अॅप तयार करण्यात येत आहे. तसेच ऑफलाइन पास देण्यासाठी देखील काही सुविधा केल्या जात आहेत.

ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पाससाठी मुंबई महापालिकेने जोरदार तयारी केली आहे. यासाठी त्यांनी योग्य त्या स्वरुपाचे नियोजन देखील सुरु केले आहे. मुंबई महापालिका राज्य सरकारच्या मदतीने हे अॅप तयार करत आहे. येत्या एक-दोन दिवसांमध्यचे अॅप पूर्णपणे तयार झालेलं असेल. अशा माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

ऑनलाइन पास कसा मिळणार?

ADVERTISEMENT

या अॅपच्या निर्मितीसाठी आणि एकूणच लसीकरणाच्या डेटासाठी मुंबई महापालिका राज्य सरकार तसेच रेल्वे प्रशासनासोबत सातत्याने चर्चा करत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चहल यांनी चर्चा देखील केली असल्याची माहिती मिळते आहे.

दरम्यान, क्यूआर कोडच्या माध्यमातून अॅपमध्येच पात्र नागरिकांना लोकल प्रवासाचा पास मिळणार असल्याचं समजतं आहे. मात्र, या अॅपची नेमकी रचना कशी असेल याविषयी अद्याप तरी नेमकी माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र, अॅपला अंतिम स्वरुप देण्याचं काम सध्या सुरु असल्याची माहिती मिळते आहे.

हा पास मिळाल्यानंतरच दोन डोस घेतलेल्या नागरिकांना तिकीट खिडकीवर लोकल प्रवासासाठी तिकीट मिळू शकणार आहे.

Mumbai Local Train: मुंबई लोकलचा पास कसा मिळवाल?, पाहा रेल्वे प्रवासासाठी नेमके नियम काय

ऑफलाइन पास कसा मिळणार?

मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा, यासाठी कोव्हिड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाइन पडताळणी प्रक्रिया उद्या (11 ऑगस्ट 2021, बुधवार) पासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 53 रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (MMR Region) 109 स्थानकांवर सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये सुरु होणार आहे. त्याआधारे नागरिकांना मासिक रेल्वे प्रवास देण्यात येईल. अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली आहे.

दरम्यान, आता पास देण्यासाठी जी यंत्रणा उभारली जाणार आहे त्यात कोणत्याही त्रुटी राहू नये असा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT