‘तरी मी देवेंद्रजींना तेव्हाच सांगत होतो, उद्धव म्हणजे…’, नारायण राणे काय म्हणाले?
Narayan Rane: भाजपचे मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे (UBT)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसंच यावेळी एक किस्सा देखील त्यांनी सांगितला.
ADVERTISEMENT

Narayan Rane Press Conference: मुंबई: राज्यात सध्या ‘फडतूस’ शब्दावरून राजकारण रंगलं आहे. शिवसेनेचे (UBT)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फडतूस म्हणत टीका केली होती. ज्यानंतर आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबतचा एक किस्साही सांगितला.. (i was telling devendra fadnavis that time uddhav thackeray is a cheater narayan rane criticized)
‘अरे हा माणूस आमच्या देवेंद्रवर बोलतोय. अरे देवेंद्रकडून किती कामं करून घेतली गोड-गोड बोलून.. तेव्हा मी देवेंद्रजींना सांगायचो.. अहो देवेंद्रजी मी 39 वर्ष राहिलोय. यांच्यासोबत तुम्ही उद्धव ठाकरेला ओळखत नाही. कधी तरी फसवतील. आता देवेंद्रना पटतंय.. राणे साहेब बोलले ते बरोबर आहे. उद्धव ठाकरे एक नंबरचा खोटारडा, विक्षिप्त, दगाबाज माणूस. पाच वर्ष देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 2019 ला मी सांगत होतो देवेंद्रजींना युती करू नका.. काही कामाचा नाही हा.. संपलाय..’ असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली.
पाहा पत्रकार परिषदेत नारायण राणे नेमकं काय-काय म्हणाले:
‘राज्याचे निष्क्रिय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाण्याला गेले आणि जाताना सांगितलं की, मी कोणाची तरी डिलिव्हरी करायला चाललो आहे. गरोदर आहे कोण तरी.. मार लागलाय.. कठीण अवस्था आहे.. म्हणून ते डिलिव्हरी करण्यासाठी गेले.. नवीन काम सुरू केलंय. मुख्यमंत्री पदावरून उतरल्यावर.’
‘खरं त्या महिलेला मार लागला होत्या.. माझ्याकडे डॉक्टरचं सर्टिफिकेट आहे.. त्यात असं म्हटलं आहे की, त्या गरोदर नव्हत्या.. त्यांना मार लागलेला नाही. डॉक्टर उमेश आरेगावकर यांचं सर्टिफिकेट आहे. असं असताना उद्धव ठाकरेंनी भाषण केलं ना ते महाभयानक आहे. त्या माणसाला चांगलं बोलता येतं की नाही हा प्रश्न आहे..’










