धक्कादायक! औरंगाबादमध्ये तरूणाची दगडाने ठेचून हत्या, मृतदेहाचा अर्धा भाग जाळला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इसरार चिश्ती,प्रतिनिधी, औरंगाबाद

ADVERTISEMENT

औरंगाबादमध्ये एका तरूणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. औरंगाबादच्या टीव्ही शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागे असलेल्या मैदानात हा प्रकार घडला आहे. हत्या एवढी भीषण होती की मारेकऱ्यांनी हत्येनंतर कंबरेच्या खाली मृतदेह जाळण्यातही आला आहे. सिद्धार्थ साळवे असं हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे.

हे वाचलं का?

शॉपिंग कॉम्प्लेक्समागील मैदानात मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस श्वान पथकासह या ठिकाणी पोहचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सिद्धार्थ साळवे असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव आहे. या तरूणाला आधी दगडाने ठेचून संपवण्यात आलं त्यानंतर त्याचा मृतदेह अर्धवट जाळण्यात आला. याप्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत असून मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदन करण्यासाठीही पाठवला आहे. पोलिसांनी या प्रकरणात प्राथमिक तपास सुरू केला आहे. अधिक माहिती तपासानंतर दिली जाईल असंही सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

आठवड्याभरातली औरंगाबादमधली ही दुसरी घटना आहे. ही हत्या एकापेक्षा जास्त लोकांनी केली असण्याची शक्यता आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे. याआधीही एका तरूणाची अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

मे 2021 मध्ये ही किरकोळ वादातून झाली होती औरंगाबादमध्ये तरूणाची हत्या

मे 2021 मध्येही किरकोळ वादातून कल्याण जायफुल्या पवार असं या तरूणाचं नाव होतं. किरकोळ वादातून त्याच्या नातेवाईकांनीच त्याची हत्या केली होती. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातल्या येसगावमध्ये ही घटना घडली होती. आता पुन्हा एकदा या प्रकारची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. यामागे नेमकं कोण आहे? त्यांनी या तरूणाला का मारलं असेल? या सगळ्या प्रश्नांचा उलगडा करण्याचा प्रयत्न आता पोलीस करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT