डॉक्टरांनी जीभ कापली तरीही महिला… नेमकं काय घडलं?
महिलेला चौथ्या स्टेजचा तोंड आणि मानेचा कर्करोग (Cancer) असल्याने तिची जीभ कापावी लागली. पण महिलेने मात्र डॉक्टरांना चुकीचं ठरवलं. ती चक्क बोलू लागली. यामुळे डॉक्टरही हैराण झाले.
ADVERTISEMENT

ब्रिटनमध्ये (Britain) एक धक्कादायक आणि आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. डॉक्टरांनी एका महिलेची जीभ पूर्ण कापली होती आणि तिला हे ही सांगितलं की, यापुढे तिला बोलता येणार नाही. खरं तर या महिलेला चौथ्या स्टेजचा तोंड आणि मानेचा कर्करोग (Cancer) असल्याने तिची जीभ कापावी लागली. पण महिलेने मात्र डॉक्टरांना चुकीचं ठरवलं. ती चक्क बोलू लागली. यामुळे डॉक्टरही हैराण झाले. (in britain Doctors cut off the tongue yet the woman started speaking miracle happen)
मिळालेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय जेम्मा वीक्स म्हणाली, ‘तिच्या जीभेवर पांढऱ्या रंगाचा छोटासा डाग गेल्या सहा वर्षांपासून होता आणि याचा तिला खूप त्रास होत होता. पण यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तिच्या जीभेवर मोठा खड्डा पडला. यामुळे तिला वेदना तर होतच होत्या याशिवाय तिला काही खाताही येत नव्हते.’
साताऱ्यातील जवानाचा संशयास्पद मृत्यू, पंजाबमधील सैन्य तळावर नेमकं काय घडलं?
जेव्हा जेम्मा याच्या उपचारासाठी डॉक्टरांकडे गेली त्यावेळी त्यांनी तिला चौथ्या स्टेजचा तोंड आणि मानेचा कर्करोग असल्याचे सांगितले. कर्करोगावरील उपचारासाठी डॉक्टरांनी तिची शस्त्रक्रिया केली आणि तिच्या जीभेचा 90 % भाग कापला. जिभेच्या शस्त्रक्रियेदरम्यान, डॉक्टरांनी जेम्माच्या हातातील टिश्यू ग्राफ्ट्स वापरून जीभेची पुनर्रचना केली होती. त्यानंतरही ती कधीच बोलू शकणार नाही डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून जेम्माच्या पायाखालची जमीन सरकली. पण नंतर एक चमत्कार घडला.
जेम्माने डॉक्टरांचं म्हणणं चुकीचं ठरवलं. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी जेम्माला भेटायला तिचा पती आणि मुलगी आली तेव्हा तिला ‘हॅलो’ म्हणण्यात यश आले. तिने त्यांना हॅलो म्हटलं.
राज ठाकरेंना सोबत घेणार का, एकनाथ शिंदे म्हणाले…
जेम्मा म्हणाली की, ‘शस्त्रक्रियेनंतर मी पूर्णपणे बोलू शकत नव्हती. डॉक्टरांना वाटलं होतं की, मी यापुढे कधीच बोलू शकणार नाही. पण शस्त्रक्रियेच्या काही दिवसानंतर मी जेव्हा पती आणि माझ्या मुलीला भेटली तेव्हा माझ्या तोंडातून पहिला शब्द हॅलो असा निघाला. जरी माझ्या आवाजात स्पष्टता नसली तरीही मी खूप आनंदी होती. कारण मी हा विचारही नव्हता केला की मी पुन्हा कधी बोलेन. हळूहळू माझ्या बोलण्यात सुधारणा होत आङे. मी याचा सराव करते. आता लोकही माझं बोलणं समजू लागले आहेत.’