धक्कादायक ! चोरीच्या उद्देशाने स्फोटकं लावून ATM मशिनमध्ये घडवला स्फोट, पैसे घेऊन चोरटे पसार
पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चाकण परिसरातील MIDC भागात चोरट्यांनी स्फोटकं लावून एटीएम मशीन फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली असून या स्फोटामुळे एटीएम मशिनचा अर्धा भाग फुटला आहे. स्फोट केल्यानंतर चोरट्यांनी पैसे घेऊन घटनास्थळावरुन पोबारा केला आहे. चोरीसाठी चोरट्यांनी वापरलेल्या या हिंसक प्रकारामुळे चाकण भागात सध्या भीतीचं वातावरण पसरलं […]
ADVERTISEMENT
पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चाकण परिसरातील MIDC भागात चोरट्यांनी स्फोटकं लावून एटीएम मशीन फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली असून या स्फोटामुळे एटीएम मशिनचा अर्धा भाग फुटला आहे. स्फोट केल्यानंतर चोरट्यांनी पैसे घेऊन घटनास्थळावरुन पोबारा केला आहे.
ADVERTISEMENT
चोरीसाठी चोरट्यांनी वापरलेल्या या हिंसक प्रकारामुळे चाकण भागात सध्या भीतीचं वातावरण पसरलं आहे. या स्फोटात एटीएम मशिनच्या दरवाजाच्या काचा फुटल्या तर पत्रे लांबपर्यंत जाऊन पडले. आंबेठाण गावाजवळ ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणात लगेचच तपासाला सुरुवात केली आहे.
या स्फोटामुळे मशिनमध्ये असलेली रक्कम बाहेर फेकली गेली तर काही रक्कम मशिनमध्ये सुरक्षीत आहे. चोरट्यांना शक्य झालं तेवढी रक्कम घेऊन त्यांनी घटनास्थळावरुन पोबारा केला. चाकण पोलिसांनी बॉम्ब शोधक पथक आणि डॉक स्कॉडच्या सहाय्याने तपासाला सुरुवात केली असून आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT