भारतात चुकीचे विचार पसरवून राजकारणासाठी वातावरण दुषित केलं जातंय-शरद पवार
आज भारतात चुकीचे विचार पसरवले जात आहेत. केवळ राजकारणासाठी वातावरण दुषित केलं जातं आहे असं म्हणत नाव न घेता शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. पुण्यात जश्न ए ईद ए मिलन या राष्ट्रीय स्नेह मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. Sharad pawar : एवढं बोलण्यासारखं आहे, पण तुम्हालाही नोटीस येईल आणि मलाही -शरद पवार […]
ADVERTISEMENT

आज भारतात चुकीचे विचार पसरवले जात आहेत. केवळ राजकारणासाठी वातावरण दुषित केलं जातं आहे असं म्हणत नाव न घेता शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. पुण्यात जश्न ए ईद ए मिलन या राष्ट्रीय स्नेह मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
Sharad pawar : एवढं बोलण्यासारखं आहे, पण तुम्हालाही नोटीस येईल आणि मलाही -शरद पवार
काय म्हणाले शरद पवार?
आपला देश अनेक जाती धर्मांनी बनला आहे. यामध्ये विविधता आहे. ती उठून दिसली पाहिजे. या देशात जी फुलं उमलली आहेत त्यांचा सन्मान करायला हवा. आज जगात चमत्कारी स्थिती निर्माण झाली आहे. रशिया छोट्याश्या युक्रेनवर हल्ला करतो आहे. हजारो लोकं मारली जात आहेत. मानवतेचं दर्शन संपल्याचं दिसतं आहे. आपल्या शेजारच्या श्रीलंकेत सामान्य नागरिक रस्त्यावर उतरला आहे. संघर्ष सुरू आहे आणि राज्यकर्ते भूमिगत झाले आहेत. पाकिस्तानात पंतप्रधानाला पद सोडावं लागलं. हे का घडतंय? कारण त्या ठिकाणचे राज्यकर्ते आणि त्यांनी घेतलेल्या भूमिका यामुळे होतंय.