धक्कादायक! कोल्हापुरात संतापलेल्या शेतकऱ्यांनी महावितरणचं कार्यालयच पेटवलं

मुंबई तक

शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपांना दिवसा सलग बारा तास वीज पुरवठा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचं शस्त्र उपसलंय. संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर ताराबाई पार्क इथल्या वीज महावितरण कार्यालयासमोर गेली दोन दिवस राजू शेट्टी यांचे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त अज्ञात शेतक-यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल महावितरणच्या कार्यकारी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपांना दिवसा सलग बारा तास वीज पुरवठा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचं शस्त्र उपसलंय. संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर ताराबाई पार्क इथल्या वीज महावितरण कार्यालयासमोर गेली दोन दिवस राजू शेट्टी यांचे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त अज्ञात शेतक-यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटविले.

या कार्यालयातील पंधराहून अधिक कम्प्युटर प्रिंटर टेबल व महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाला आहे. कागलच्या शाहू साखर कारखान्याच्या व कागल नगरपालिकेच्या अग्निशामक दलाकडून ही आग आटोक्यात आणण्याचा महावितरणचा प्रयत्न केला.त्यामुळे आज दिवसभरात राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांन कडुन आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या मान्य होईपर्यंत शासनाची तडजोड करणार नाही, शेट्टी यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले की संयमाची भूमिका घ्या सत्याग्रहाच्या माध्यमातून आपण आंदोलन करतोय कुणीही गालबोट लावू नये. असं आंदोलन केलं नाही तर पोलीस आपल्यावर लाठीचार्ज करून हे आंदोलन हाणून पाडतील त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती करतो की संयम बाळगा आणि महाराष्ट्र सरकार च्या नेतेमंडळींना शेतकऱ्यांची पोर अंत पाहू नका. रात्रीच्या वेळेला शेतकरी मोटर पंप सुरू करण्यात जातोय अशा वेळेला साप जलचर प्राण्यां मुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय आता त्यांची मुलं हे सहन होण्याच्या पलीकडे झाले त्यामुळे दिवसा बारा तास वीज द्यावी असा इशाराही संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

आंदोलनाचा बुधवारी दुसरा दिवस होता. स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे रात्रभर महावितरण कार्यालयासमोर झोपून होते. दरम्यान महावितरणला जागं करण्यासाठी मी कोल्हापुरात आंदोलन करतोय. तर स्वाभिमानीच्या इतर कार्यकर्त्यांनी आपल्या जिल्ह्यात महावितरण कार्यालयासमोर शांततेने आव्हान करावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले होते. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp