महाराष्ट्रात 3 हजारांहून अधिक Corona रूग्णांचं दिवसभरात निदान, 70 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 3131 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात दिवसभरात 70 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के झाला आहे. आज राज्यात 4021 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 44 हजार 744 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.2 टक्के इतकं झालं […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 3131 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात दिवसभरात 70 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के झाला आहे. आज राज्यात 4021 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 44 हजार 744 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.2 टक्के इतकं झालं आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 73 लाख 7 हजार 825 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 27 हजार 629 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला 2 लाख 72 हजार 98 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1704 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
हे वाचलं का?
राज्यात आज घडीला 40 हजार 712 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 3131 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 27 हजार 629 इतकी झाली आहे.
महाराष्ट्रातले एक हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण असलेले जिल्हे
ADVERTISEMENT
मुंबई- 4966
ADVERTISEMENT
ठाणे-5654
पुणे-10875
सातारा-2256
सांगली-1139
अहमदनगर-5530
सक्रिय रूग्ण असलेले जिल्हे पाहिले तर लक्षात येतं की पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रूग्ण आहेत. त्यानंतर ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यांचा आणि मग मग मुंबईचा क्रमांक लागतो.
देशातील प्रमुख शहरं मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरूमधील आर-व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आहेत. तर दिल्ली आणि पुण्यात आर-व्हॅल्यू 1 पेक्षा कमी आहे. राज्यांचा विचार करता महाराष्ट्र आणि केरळमध्ये आर-व्हॅल्यू ही 1 पेक्षा कमी आहे. मात्र, यापूर्वी याच दोन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाची प्रकरणं नोंदवली गेली होती. तर, करोनाच्या सर्वात जास्त सक्रिय प्रकरणांच्या नोंदीदेखील या दोन राज्यांमध्ये झाल्या होत्या.
चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेसच्या सीताभारा सिन्हा म्हणाल्या की, चांगली बातमी अशी आहे की भारताची आर-व्हॅल्यू केरळ आणि महाराष्ट्राच्या तुलनेत 1 पेक्षा कमी आहे. या दोन्ही राज्यांत ही दोन राज्यं सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. सिन्हा या आर-व्हॅल्यूची गणना करणाऱ्या संशोधकांच्या टीमचं नेतृत्व करत आहेत. आकडेवारीनुसार, मुंबईची आर-व्हॅल्यू 1.09, चेन्नईची आर-व्हॅल्यू 1.11, कोलकाता 1.04, बेंगळुरूची आर-व्हॅल्यू 1.06 इतकी आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT