पोलीस अधिकाऱ्याने मध्यरात्री केलं असं काम की, ज्यामुळे वाचले 15 कोरोना रुग्णांचे प्राण
नागपूर: कोरोनाचं (Corona) संकट एवढं भयंकर झालं आहे की, यातून नेमका मार्ग कसा काढायचा हेच सर्वांना उमजेनासं झालं आहे. पण अशा संकटाच्या वेळी देखील काही जण अक्षरश: देवदूतासारखे धावून येत आहेत. त्यामुळे अद्यापही माणुसकी शिल्लक असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच आता एका पोलीस अधिकाऱ्याने (Police Officer) मध्यरात्री एक असं काम केलं आहे की, त्यामुळे तब्बल […]
ADVERTISEMENT

नागपूर: कोरोनाचं (Corona) संकट एवढं भयंकर झालं आहे की, यातून नेमका मार्ग कसा काढायचा हेच सर्वांना उमजेनासं झालं आहे. पण अशा संकटाच्या वेळी देखील काही जण अक्षरश: देवदूतासारखे धावून येत आहेत. त्यामुळे अद्यापही माणुसकी शिल्लक असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच आता एका पोलीस अधिकाऱ्याने (Police Officer) मध्यरात्री एक असं काम केलं आहे की, त्यामुळे तब्बल 15 कोरोना रुग्णांचे जीव वाचले आहेत.
त्याचं झालं असं की, नागपुरातील (Nagpur) जरीपटका परिसरातील नमुनाबाई तिरपुडे रुग्णालयातील व्यवस्थापनाने रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन जरीपटका येथे पत्र दिले की, त्यांच्या हॉस्पिटलला ऑक्सिजन (Oxygen) सिलेंडरची तात्काळ आवश्यकता आहे. वेळीच पुरवठा झाला नाही तर 15 रुग्णांचे जीव धोक्यात येऊ शकतात. रुग्णालयाला नियमित होणाऱ्या पुरवठादारांकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत नसून त्यांना दहा ऑक्सिजन सिलेंडरची तात्काळ आवश्यकता आहे.
धार्मिक स्थळांच्या माध्यमातून कोव्हिड रुग्णांची सेवा करणारे कोव्हिड योद्धे
रात्री एक वाजता तिरपुडे रुग्णालयाचे डॉ. शिवाजी सुपलकर हे स्वत: ऑक्सिजन सिलेंडर तात्काळ मिळावे यासाठीचे पत्र घेऊन पोहोचले. या घटनेचं गांभीर्य ओळखून जरीपटका पोलीस स्टेशन येथे रात्री कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक महादेव नाईकवाडे यांनी आपल्या चार सहकाऱ्यांसह जरीपटका परिसरातील ऑक्सिजन प्लांट येथे धाव घेतली.










