पुण्यात बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या फोटोला शिवसैनिकांकडून जोडे मारत आंदोलन
शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आज पुण्यातील कोथरूड येथील कर्वे पुतळ्यासमोर शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या फोटोला शिवसैनिकांकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.तर एकनाथ शिंदे विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. Osmanabad: बंडखोर आमदार तानाजी सावंत यांना ‘खेकडा’ म्हणत शिवसैनिकांची घोषणाबाजी […]
ADVERTISEMENT

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आज पुण्यातील कोथरूड येथील कर्वे पुतळ्यासमोर शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या फोटोला शिवसैनिकांकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.तर एकनाथ शिंदे विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
Osmanabad: बंडखोर आमदार तानाजी सावंत यांना ‘खेकडा’ म्हणत शिवसैनिकांची घोषणाबाजी
शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील सहा दिवसापासून शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे.यामुळे राज्यामधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं दावा केला असून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचा ‘रात्रीस राजकीय खेळ’?; पहाटे २ ते ४ दरम्यान गुजरातला काय घडलं?