पुण्यात Fire brigade च्या दोन जवानांनी 15 वर्षांच्या मुलीला चौथ्या मजल्यावरून सुखरूप वाचवलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यातील शुक्रवार पेठेत 15 वर्षांची एक मुलगी केस वाळवण्यासाठी इमारतीच्या टेरेसवर गेली असता तोल जाऊन खाली पडली. पण पडताना ती चौथ्या मजल्याच्या खिडकीच्या कठड्यावर जाऊन अडकली. काही सेंटीमीटर जागेत ही मुलगी उभी असल्याने पाहणाऱ्यांचा थरकाप उडाला. इमारतीतल्या लोकांनी आधी टेरेसवरून साडी खाली सोडून या मुलीला वर खेचण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

मात्र ही मुलगी घाबरून गेली होती. त्यामुळे त्या मुलीला साडी पकडता येईना. त्यानंतर अग्निशमन दलाला या मुलीची सुटका करण्यासाठी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आधी शिडीच्या सहाय्याने मुलगी जिथे अडकली होती तिथपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. पण शिडी चौथ्या मजल्याच्या खिडकीपर्यंत पोहचू शकली नाही. त्यानंतर सचिन मांडवकर आणि कैलास पायगुडे हे अग्नीशमन दलाचे दोन जवान या पाच मजली इमारतीच्या टेरेसवर गेले आणि कमरेला दोर बांधून ते चौथ्या मजल्याच्या सज्जावर उतरले. त्यानंतर त्यांनी तिथे अडकलेल्या मुलीच्या कमरेलाही दोर बांधला आणि ते मुलीला घेऊन शिडीवरून सुखरुप खाली उतरले. अशा पद्धतीने पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी चौथ्या मजल्याच्या सज्जात अडकलेल्या मुलीची थरारक पद्धतीने सुटका केली. त्यानंतर या जवानांचं चांगलंच कौतुक होतं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT