NEET : “मी ‘नीट’ परिक्षेचा पेपर फोडला”; पश्चाताप होत असल्याने पर्यवेक्षकाने दिली कबुली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लातूर : सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या नीट परीक्षेचा पेपर फुटला असून तो आपणच फोडल्याचा दावा लातूर येथील रिलायन्स त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालयाचे तत्कालिन पर्यवेक्षक सांबदेव शंकरराव जोशी यांनी केला. या कृत्याबाबत आपल्याला पश्चातप होत असल्यामुळे याची कबुली देऊन स्वतः पोलिसांकडे तक्रार दिली असल्याचं जोशी यांनी सांगितलं. तसंच त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थाचालक उमाकांत होनराव व त्यांचा मुलगा ओमकार उमाकांत होनराव यांच्या धमकीमुळे हे कृत्य केलं असल्याचा आरोपही जोशी यांनी केला.

ADVERTISEMENT

याबाबत दिलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, सध्या मी खाजगी नोकरी करत असून मी ०३ नोव्हेंबर २०१८ ते २३ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत रिलायन्स त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय लातूर या कॉलेजमध्ये नोकरीस होतो. या दरम्यान, २०२१ मध्ये १२ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या नीट परिक्षेचे केंद्र रिलायन्स त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय हे ही होते. या परिक्षेत महाविद्यालयाचे संस्थाचालक उमाकांत होनराव व ओंकार उमाकांत होनराव यांच्याशी संगनमत करून मी सदर परिक्षेचे पेपर फोडण्याचे काम केले. मात्र संस्थाचालक उमाकांत होनराव व ओंकार उमाकांत होनराव यांच्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे आणि भीतीमुळे हे कृत्य केले.

१२ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी २.०० से ५.०० या वेळेस नीटची परीक्षा होती. त्या दिवशी पर्यवेक्षक म्हणून माझी नियुक्ती सदर संस्थेच्या ३०५ या वर्गावर होती. परंतु संस्थाचालक उमाकांत होनराव यांनी अचानक माझी नियुक्ती बदलुन ३०३ या वर्गावर Isolation मध्ये दिली. त्यानंतर संस्थाचालक उमाकांत होनराव व ओंकार उमाकांत होनराव यांच्या सांगण्यावरून, २ वाजता पेपर चालू होताच२ वाजून ९ मिनिटांनी मी प्रश्नपत्रिकेचे फोटो माझ्या व चव्हाण मॅडम यांच्या मोबाईलमध्ये काढले. यात माझ्या मोबाईलमध्ये २४ फोटो आणि चव्हाण मॅडम यांच्या मोबाईलमध्ये १८ फोटो काढले होते. ते फोटो मी मोबाईलसह ओंकार होनराव यांना नेऊन दिले, जे की हॉस्टेलच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये आलेले आहे.

हे वाचलं का?

सदर पेपरफुटीच्या गैरकारभारात माझ्यासह उमाकांत होनराव, हणमंत गांद्दिमे, दिपक होनराव, पूरी सर, धुमाळ रामराजे, शेख सर, किरण आलुरे, श्रीकृष्ण जाधव सर, श्रीराम कुलकर्णी, पियुषसिंग गोयल रा.इस्लामपूर आणि अज्ञात बेळगावच्या इतर चार शिक्षकांचा समावेश समावेश असल्याचंही त्यांनी अर्जात लिहले आहे. सोबतच याबद्दल कोणाशी चर्चा केल्यास जिवे मारण्याची धमकी संस्थाचालक उमाकांत होनराव व ओंकार उमाकांत होनराव यांनी दिली असल्याने माझ्यासह त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी जोशी यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT