किशोरी पेडणेकरांवर शिंदे गटात जाण्यासाठी दबाब? ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांवर एसआरए प्रकल्पातील गाळे हडपल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला. सोमय्यांच्या आरोपांमुळे किशोरी पेडणेकरांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच किशोरी पेडणेकरांवर शिंदे गटात जाण्यासाठी हा दबाब टाकला जात असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. याचसंदर्भात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलीये.

ADVERTISEMENT

गोमाता नगर एसआरए प्रकल्पातील गाळे किशोरी पेडणेकर यांनी कागदपत्रात फेरफार करून हडप केले असा आरोप किरीट सोमय्यांनी केलेला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून किशोरी पेडणेकरांची चौकशी सुरू असून, आज दुसऱ्यांदा किशोरी पेडणेकरांनी जबाब नोंदवला.

चौकशीनंतर बाहेर पडल्यानंतर किशोरी पेडणेकरांनी माध्यमांशी संवाद साधला. “मला ज्या प्रश्नांची उत्तरं येत होती, ती दिलीये. मी पोलिसांना सहकार्य करणार नाही, अशी खोटी माहिती पसरवली जात आहे. तसं मी करणार नाही. कायद्यानुसार, उत्तरं देईन.”

हे वाचलं का?

Andheri bypoll : निवडणूक आयोगाकडे नोटाच्या प्रचाराची तक्रार, भाजपचा उल्लेख करत अनिल परबांचा गौप्यस्फोट

किरीट सोमय्यांचे आरोप, किशोरी पेडणेकरांनी मांडली भूमिका

पुढे बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “मी मुख्यमंत्र्यांना निरोप दिलाय. माझं निवेदन घेऊन जाणार आहे. ते मूळ शिवसैनिक आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तसेच राज्याचे गृहमंत्री म्हणून फडणवीस यांना भेटणार आहे. तो माझा हक्क आहे”, असं सांगतानाच “जाणीवपूर्वक आपल्याला बदनाम करण्याकरता खोटे आरोप केले जात आहे”, असा दावा पेडणेकरांनी केलाय.

ADVERTISEMENT

शिवसेनेतल्या फुटीपासून शिंदे गटातल्या नेत्यांवर आणि भाजप टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये किशोरी पेडणेकरांचाही समावेश होतो. त्याचमुळे त्यांच्यावर दबाब टाकला जात असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. संजय राऊतांचा उल्लेख करत सुप्रिया सुळेनींही असाच आरोप केला आहे.

ADVERTISEMENT

किशोरी पेडणेकरांवर आरोप, अनिल परबांनी काय दिलं उत्तर?

आता या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून प्रतिक्रिया आलीये. अनिल परब यांची पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत त्यांना किशोरी पेडणेकर यांच्यावर शिंदे गटात जाण्यासाठी दबाब आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यावर अनिल परब म्हणाले, “किशोरी पेडणेकर आपल्याला माहितीये की, शिवसेनेची लढवय्यी तोफ आहेत. प्रत्येक अशा तोफेला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सगळ्यांकडून होणार आहे. आज किशोरी पेडणेकर त्यांना सडेतोड उत्तर देताहेत. प्रत्येक गोष्टीत त्या आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर असा प्रयत्न केला, तर नवल वाटण्याची गरज नाही”, असं म्हणत अनिल परब यांनी अप्रत्यक्षपणे किशोरी पेडणेकर यांच्यावर दबाब असल्याचं म्हटलंय.

“अशा प्रकारच्या चौकशा सुरू झाल्या म्हणजे समजायचं निवडणुका आल्या. आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या साऱ्या चौकशा सुरू आहेत. ज्यांच्या चौकशा चालू होत्या आणि शिंदे गटात गेले, त्या सर्वांच्या चौकशा बंद झाल्यात. अशा परिस्थिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून वस्तुस्थिती सांगावं, हे त्यांना योग्य वाटत असेल, तर त्यांनी आपली बाजू मांडलीच पाहिजे”, असंही परब म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT