नरेंद्र मोदींना इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिली ‘ऑफर’; ‘तुम्ही फार लोकप्रिय आहात,…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ग्लासगो येथील जागतिक हवामान बदल परिषदेदरम्यान ( COP26 climate summit) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांची भेट झाली. या भेटीवेळी इस्रायलच्या पंतप्रधानांनी मोदींना चक्क ऑफर दिली. बेनेट यांची ऑफर ऐकून मोदींनाही हसू अनावर झालं. या भेटीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Israeli Prime Minister Naftali Bennett invited PM Narendra Modi to join his party)

ADVERTISEMENT

ग्लासगो येथील जागतिक हवामान बदल परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. या परिषदेत कार्बन उत्सर्जनाबद्दल चिंता व्यक्त करत जागतिक तापमान वाढ रोखण्यावर विचारमंथन करण्यात आलं. या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बोनेट यांची भेट झाली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत पंतप्रधान बेनेट आणि पंतप्रधान मोदी हस्तांदोलन करत चर्चा करताना दिसत आहे. चर्चेवेळी पंतप्रधान बेनेट मोदींना म्हणत आहेत की, ‘आपण इस्रायलमध्ये फार लोकप्रिय आहात. या आणि माझ्या पक्षात प्रवेश करा’, असं बेनेट म्हणाले. ही ऑफर ऐकून मोदींना हसू अनावर झालं.

हे वाचलं का?

इस्रायलच्या पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर नफ्ताली बेनेट आणि पंतप्रधान मोदी यांची ही पहिलीच भेट होती. जूनमध्ये बेन्जामिन नेतान्याहू यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर नफ्ताली बेनेट यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दोन्ही नेत्यांच्या भेटीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. पंतप्रधान बेनेट आणि पंतप्रधान मोदी यांच्यात उच्च तंत्रज्ञान आणि संशोधनाचा विस्तार करण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशातील संबंध वृद्धिंगत होण्यावर भर देण्यात आला.

ADVERTISEMENT

शून्य कार्बन उत्सर्जनाचं लक्ष्य

ADVERTISEMENT

ग्लासगो येथे हवामान बदल परिषदेत बोलताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाच्या समतोल वापरातून 2070 पर्यंत शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्याची घोषणा केली. २०३० पर्यंत भारताची इंधनाची निम्मी गरज ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांतून भागविली जाईल, असं सांगत हे लक्ष्य साध्य करण्याची पंचसूत्री मोदी यांनी ग्लासगो परिषदेत मांडली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT