Uddhav Thackeray यांच्या डोक्यावर शरद पवारांचा हात असल्यानेच ते मुख्यमंत्री-अमोल कोल्हे

मुंबई तक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा हात आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आमच्या मनात 100 टक्के आदर आहे असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. मात्र शिवसेनेला अमोल कोल्हे यांनी सणसणीत टोला लगावला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर खेड-घाट व नारायणगाव बायपास […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा हात आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आमच्या मनात 100 टक्के आदर आहे असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. मात्र शिवसेनेला अमोल कोल्हे यांनी सणसणीत टोला लगावला आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर खेड-घाट व नारायणगाव बायपास उद्घाटनावरून पुणे जिल्ह्यातील शिरूर मतदारसंघात दोन दिवस चांगलंच राजकारण बघण्यास मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज या दोन्ही बायपासचं उद्घाटन केलं. मात्र शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी अढळराव यांनी बायपासचं शिवसैनिकांना घेऊन अचानक उद्घाटन केलं त्यावरून अमोल कोल्हे यांनी टीका केली.

आज शनिवारी सकाळी खेड बायपास व दुपारी नारायणगाव बायपासची अधिकृत उद्घाटने करत डॉ अमोल कोल्हे यांनीही आढळराव यांच्यावर चांगलीच बोचरी टीका केली. माजी आमदार शरद सोनवणे व माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्यावर कोटी केली. ‘निवडणुकीनंतर पद गेल्यानंतरची ही अस्वस्थता राज्यात अनेकांना आहे. दुर्दैवाने शिरुरमध्ये सुद्धा आढळराव बैचेन आहेत. त्यातूनच त्यांनी हे काल हे उद्घाटन केलंय. इतक्या वयस्कर व्यक्तीने असं वागणं बर नाही.’ राज्यपातळीवरही अशीच अस्वस्थता बघायला मिळते आहे असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही नाव न घेता टोलेबाजी केली आहे.

हे वाचलं का?