Narayan Rane: ‘राणेंची मंत्रिपदावरुन गच्छंती होण्यास वेळ लागणार नाही’, कोणी साधला राणेंवर निशाणा?

मुंबई तक

सिंधुदुर्ग: ‘मंत्रिपदाचा वापर राणेंनी देशाच्या विकासासाठी करावा. नाही तर इतर मंत्र्यांची जशी गच्छंती झाली तशीच गच्छंती व्हायला वेळ लागणार आहे.’ अशी खरमरीत टीका शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार आणि नारायण राणे यांचे कोकणातील कट्टर प्रतिस्पर्धी दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी केली आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर शिवसेनेत काहीसं अस्वस्थतेचं वातावरण असल्याची चर्चा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सिंधुदुर्ग: ‘मंत्रिपदाचा वापर राणेंनी देशाच्या विकासासाठी करावा. नाही तर इतर मंत्र्यांची जशी गच्छंती झाली तशीच गच्छंती व्हायला वेळ लागणार आहे.’ अशी खरमरीत टीका शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार आणि नारायण राणे यांचे कोकणातील कट्टर प्रतिस्पर्धी दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी केली आहे.

नारायण राणे (Narayan Rane) यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर शिवसेनेत काहीसं अस्वस्थतेचं वातावरण असल्याची चर्चा आहे. याच वेळी शिवसेनेचे आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणेंवर बरीच टीका केली आहे.

पाहा दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले:

‘नारायण राणे शिवसेनेवर जी आगपाखड करतात त्यामुळे त्यांना केंद्रांमध्ये मंत्रिपद मिळालेलं आहे. या मंत्रिपदाचा वापर त्यांनी महाराष्ट्रासह भारतातल्या जनतेसाठी करावा.’

हे वाचलं का?

    follow whatsapp