जगदीप धनकड देशाचे नवे उपराष्ट्रपती, 528 मतं घेत अल्वांचा केला पराभव

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. व्यंकय्या नायडू यांच्यानंतर देशाचे पुढील उपराष्ट्रपती कोण होणार याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. एमडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांचा विजय झाला आहे. धनकड यांना 528 मतं मिळाली तर अल्वा यांना 182 मतं मिळाली. विरोधी पक्षांच्या उमेदार मार्गारेट अल्वा यांचा पराभव झाला आहे. उपराष्ट्रपती पदासाठी आज सकाळी 10 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 5 वाजता संपले. यानंतर सायंकाळी सहा वाजता मतमोजणी सुरू झाली.

ADVERTISEMENT

346 मतांनी केला मार्गारेट अल्वांचा पराभव

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड विजयी झाले आहेत. धनकड यांना 528 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मार्गारेट अल्वा यांना 182 मतं मिळाली आहेत. 15 खासदारांची मतं फेटाळण्यात आली आहेत. धनकड आता 11 ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार भेटीला

एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड हे देशाचे पुढील उपराष्ट्रपती असणार आहेत. त्यांनी 528 मतांनी विजय नोंदवला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगदीप धनकड यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करणार आहेत.

हे वाचलं का?

जगदीप धनकड यांचे अभिनंदन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले. देशाचे उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल आदरणीय श्री जगदीप धनकड यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमची उपराष्ट्रपती म्हणून निवड होणे ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. मला खात्री आहे की उपराष्ट्रपती म्हणून तुमचा कार्यकाळ पूर्णत: यशस्वी होईल असे ट्विट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

दरम्यान भाजपने उमेदवारी दिलेल्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी आहेत. द्रौपदी मुर्मू यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. या विजयाबरोबरच द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या होत्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT