अनैतिक संबंध लपवण्यासाठी आईने मुलाची प्रियकराच्या मदतीने केली हत्या, जळगावमधली धक्कादायक घटना

मुंबई तक

मनिष जोग, प्रतिनिधी, जळगाव जळगाव जिल्ह्यात आईनेच आपल्या पोटच्या मुलाची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलाला आईच्या अनैतिक संबंधांबाबत समजलं होतं. तसंच तो अडसर ठरू शकतो हे लक्षात आल्यानंतर आईने तिच्या प्रियकराच्या साथीने मुलाला संपवलं आहे. मुलाला ब्राह्मणपूर येथील जंगलात नेऊन गळफास देऊन त्याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी मुलाची आई आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मनिष जोग, प्रतिनिधी, जळगाव

जळगाव जिल्ह्यात आईनेच आपल्या पोटच्या मुलाची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलाला आईच्या अनैतिक संबंधांबाबत समजलं होतं. तसंच तो अडसर ठरू शकतो हे लक्षात आल्यानंतर आईने तिच्या प्रियकराच्या साथीने मुलाला संपवलं आहे. मुलाला ब्राह्मणपूर येथील जंगलात नेऊन गळफास देऊन त्याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी मुलाची आई आणि तिचा प्रियकर अशा दोघांना अटक केली आहे.

पुरूषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. तो 14 वर्षांचा होता. सावरखेडा शिवार, जलराम नगर जळगाव या ठिकाणी तो वास्तव्यास होता. प्रशांतचे वडील खासगी वाहन चालक आहेत अशीही माहिती मुंबई तकला मिळाली आहे.

Crime: इंजिनिअर मुलाने आई-वडिलांसमोर केली पत्नीची हत्या, मुंडकं कापून फेकलं नाल्यात तर धड टाकून दिलं जंगलात

हे वाचलं का?

    follow whatsapp