जात पंचायतीचा विळखा : पंचांची थुंकी चाटायला लावल्याची शिक्षा केल्याचा पीडितेचा आरोप
धनंजय साबळे, अकोला प्रतिनीधी शाहू, फुले-आंबेडकरांसारख्या थोर सामाजिक पुढाऱ्यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात आजही जातपंचायत नावाची कुप्रथा सुरु आहे. अकोल्यातील वडगाव परिसरात जातपंचायतीचा फटका एका महिलेला बसला आहे. पंचायतीने शिक्षा सुनावताना आपल्याला पंचांची थुंकी चाटायला लावल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. जातपंचायतीच्या परवानगीशिवाय पुनर्विवाह केल्याच्या रागातून ही शिक्षा करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. परंतू वडगावमधील […]
ADVERTISEMENT
धनंजय साबळे, अकोला प्रतिनीधी
ADVERTISEMENT
शाहू, फुले-आंबेडकरांसारख्या थोर सामाजिक पुढाऱ्यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात आजही जातपंचायत नावाची कुप्रथा सुरु आहे. अकोल्यातील वडगाव परिसरात जातपंचायतीचा फटका एका महिलेला बसला आहे. पंचायतीने शिक्षा सुनावताना आपल्याला पंचांची थुंकी चाटायला लावल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. जातपंचायतीच्या परवानगीशिवाय पुनर्विवाह केल्याच्या रागातून ही शिक्षा करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. परंतू वडगावमधील नागरिकांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
हे वाचलं का?
काय आहे घटनेची पार्श्वभूमी??
अकोल्यातील वडगावमध्ये नाथजोगी समाजातील साईनाथ बाबर यांच्याशी २०११ साली पीडित महिलेचं लग्न झालं. पीडितेचं माहेर हे जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथलं आहे. परंतू दोघांमध्ये पटत नसल्यामुळे २०१५ साली पीडितेने रितसर घटस्फोट घेतला. २०१९ मध्ये पीडीतेने पुन्हा लग्न केलं. परंतू हे लग्न करताना जात पंचायतीची परवानगी घेतली नाही म्हणून रागावलेल्या पंचायतीने ९ एप्रिल २०२१ ला वडगाव येथे भरलेल्या पंचायतीत पीडित महिलेला चक्क थुंकी चाटण्याची शिक्षा सुनावत १ लाखांचा दंड ठोठावला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
गावकऱ्यांनी आरोप फेटाळले, पोलीस तपास सुरु –
जातपंचायचीवर गंभीर आरोप झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. अंनिस कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पीडीतेने आधी जळगाव पोलिसांत याबद्दल तक्रार दाखल केली. ज्यानंतर हा गुन्हा अकोला पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. परंतू पीडीत महिलेने केलेला आरोप हा गावाची आणि समाजाची बदनामी करण्यासाठी केला असल्याचं म्हणत गावकऱ्यांनी आरोप फेटाळले आहेत.
याप्रकरणात विधान परिषदेच्या उप-सभापती निलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र लिहलं आहे. तसेच अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यानंतर अकोला पोलिसांनी या प्रकरणात नातेवाईक आणि गावकऱ्यांचे जबाब नोंदवायला सुरुवात केली आहे.
पीडित कुटुंबाचा कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार –
मुंबई तक च्या प्रतिनिधींनी पीडित कुटुंबाशी चोपडा येथे जाऊन त्यांची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांनी यावर बोलण्यास नकार दिलाय.
याआधीही महाराष्ट्रात जात-पंतायतीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून वारंवार होताना दिसत आहे. त्यामुळे अकोला पोलीस या घटनेचा कसा तपास करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT