जिया खान आत्महत्या प्रकरण: विशेष CBI कोर्टाने दिला मोठा निकाल; सूरज पांचोलीची…

मुंबई तक

ADVERTISEMENT

jiah khan death case special cbi court delivers major verdict acquitting actor sooraj pancholi
jiah khan death case special cbi court delivers major verdict acquitting actor sooraj pancholi
social share
google news

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्यू प्रकरणाचा अखेर निकाल देण्यात आला आहे. मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिया खान प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. तब्बल 10 वर्षानंतर या प्रकरणावर कोर्टाने निकाल देताना अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता केली आहे. जिया खानने 3 जून 2013 रोजी मुंबईतील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. तिच्या निधनाने इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. या प्रकरणी जिया खानच्या आईने तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटकही केली होती. मात्र, नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. पण आता कोर्टाने त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे जियाची आई राबिया खान यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. (jiah khan death case special cbi court delivers major verdict acquitting actor sooraj pancholi)

सूरज पांचोलीला मोठा दिलासा

जिया खान आत्महत्या प्रकरणी सीबीआय न्यायालयाने सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता केली आहे. सूरजवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. जियाच्या आईने आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी सूरजला जबाबदार धरले होते. पण पुराव्याअभावी न्यायालयाने सूरजची निर्दोष मुक्तता केली आहे. सूरजवर कोणताही खटला चालू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. कोर्टाचा निर्णय ऐकल्यानंतर सूरज पांचोलीने आभार मानले. तर सूरजची आई जरीना वहाब यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. दुसरीकडे जिया खानची आई राबिया या निर्णयावर अजिबात खूश नाही.

जियाने तिच्या करिअरच्या शिखरावर असताना केलेली आत्महत्या

आपल्या करिअरच्या शिखरावर असतानाच 25 वर्षीय जिया खानने मृत्यूला कवटाळले होते. ज्यामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ माजली होती. खरं तर जियाने अवघ्या तीनच चित्रपटात काम केलं होतं. पण तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर आपला ठसा सिनेसृष्टीत उमटवला होता. जे अनेक नायिकांना वर्षानुवर्षे मेहनत करूनही करू जमत नाहीत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> न्यूड सीन करण्यापूर्वी रडलेली ‘ही’ अभिनेत्री रडली, आज जगतेय असे आयुष्य…

जियाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत निशब्द या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती हाऊसफुल आणि गजनीमध्ये दिसली होती. यशस्वी करिअर असलेल्या जिया खानला फिल्म इंडस्ट्रीत मोठी संधी होती, पण त्याआधीच ती प्रेमात एवढी अडकली की एक दिवस त्रासून तिनं आपलं आयुष्य संपवलं.

3 जून 2013 रोजी, तरुण प्रतिभावान जियाच्या मृत्यूची बातमी समोर आली, तेव्हा चित्रपटसृष्टीतील सर्वांनाच मोठा धक्का बसलेला. अनेकांना जाणून घ्यायचं होतं की, जियाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

सूरज पांचोलीच्या प्रेमात होती जिया

जियाच्या मृत्यूनंतर तिच्या आईने सूरज पांचोलीवर गंभीर आरोप केले होते. जियाच्या मृत्यूला सूरज जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तो तिच्या मुलीला डेट करत होता. त्यानेच जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले. असे गंभीर आरोप त्या सातत्याने करत होत्या. तर दुसरीकडे सूरज हा नेहमी स्वतःला निर्दोष असल्याचं सांगत होता.

हे ही वाचा>> ऋतुराज गायकवाडसोबत अफेअर…? मुंबई Tak बैठकीत अभिनेत्री सायली संजीव स्पष्टच म्हणाली

जियाच्या मृत्यूनंतर पोलिसांना 6 पानी पत्र मिळाले होते. ज्यामध्ये तिने काही गंभीर गोष्टी सांगितल्या होत्या. ती सूरज पांचोलीला डेट करत होती. पण या नात्याने तिला आनंद कमी आणि दुःख जास्त दिले. जियाच्या याच पत्राच्या आधारे पोलिसांनी सूरज पांचोलीलाही अटक केली होती. ज्यांना नंतर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. पण जियाच्या आईने हार मानली नव्हती. न्यायालयाने सूरज आरोपी असल्याचे नाकारल्यानंतर राबियाने पुन्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेले होते. याप्रकरणी राबियाने पीएम मोदींकडेही मदत मागितली होती.

जियाने पत्रात काय लिहलेलं?

पत्रात जियाने लिहलेलं की, आता तिच्याकडे गमावण्यासारखं काही उरलेलं नाही. ती आतून मोडून पडली आहेत. तिने स्वतःला विसरून प्रेम केलं होतं. पण ज्याच्यावर मी प्रेम केले, त्याने मला रोज त्रास दिला. सर्व स्वप्नांचा चुराडा झाला आहे. प्रेमात बेवफाई झाल्याचेही जियाने नमूद केलं होतं. जियाने एका पानावर लिहिलं की, – ‘समस्या अशी आहे की तुमची आवड असलेली व्यक्ती इतर मुलींसाठी तुम्हाला शिवीगाळ करते, धमकावते, मारते आणि फसवते.’

कोण आहे सूरज पांचोली?

32 वर्षीय सूरज पांचोलीला सिनेजगताची पार्श्वभूमी आहे. कारण तो अभिनेता आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा आहे. सूरजचे आजोबा राजन पांचोली हे चित्रपट निर्माते होते. सूरज जिया खानसोबत रिलेशनशिपमध्ये होता. जियाच्या आत्महत्येत सूरजचे नाव आल्यावर लोक त्याला ओळखू लागले होता.

हे ही वाचा>> ओमकार टॅटूमुळे गदारोळ… पतीच्या मृत्यूनंतर झाली ट्रोल, कोण आहे ‘ही’ अभिनेत्री?

त्याने 2015 मध्ये ‘हिरो’ चित्रपटातून पदार्पण केले होते. सूरजला सलमान खानने लॉन्च केले होते. पण सूरजचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला होता. यानंतर तो टाइम टू डान्स, सॅटेलाइट शंकरमध्ये दिसला. पण दोन्ही सिनेमे चालले नाहीत. त्याचा आगामी चित्रपट ‘हवा सिंह’ आहे. सूरजने अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी गुजारिश आणि एक था टायगरमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्याने GF BF आणि Dim Dim Lights या म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT