कल्याण : पत्नी व मुलावर हल्ला, स्वतःला संपवलं; घरातील दृश्य पाहून सोसायटीचे सदस्यही हादरले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कल्याणमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना घडत असून, कल्याण पश्चिममध्ये विचित्र घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नी आणि मुलाला हल्ला करून जखमी केलं आणि नंतर स्वतःला संपवल्याचा प्रकार समोर आला आहे.

ADVERTISEMENT

मयत व्यक्तीच्या जखमी झालेल्या मुलाने पोलिसांना ही माहिती दिली. मयत व्यक्ती सेवानिवृत्त मोटरमन असून, प्रमोद बनोरिया मयताचं नाव आहे. मुलाचं नाव लोकेश बनोरिया आहे. ही घटना रात्री घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

कल्याण: डॉक्टरचं चीड आणणारं कृत्य; तब्बल 71
अल्पवयीन मुलांची सुटका

हे वाचलं का?

कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात निखिला हाईट्स ही हाय प्रोफाइल सोसायटी आहे. या सोसायटीतील रहिवाशांनी कल्याणमधील महात्मा फुले पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. घटना कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस अधिकारी प्रदीप पाटील आपल्या पथकासोबत इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पोहचले असता, घरात एक तरुण जखमी अवस्थेत आढळून आला. त्यानंतर पोलिसानी घरात जाऊन पाहिले असता एक महिला जखमी अवस्थेत पडलेली होती. तर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. यावेळी घरात सर्वत्र रक्त पसरले होते. ही घटना रात्री घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

नेमक काय घडलं?

ADVERTISEMENT

लोकेश याने वडिलांनी आम्हाला जखमी केलं आणि त्यांनंतर स्वतःला संपवुन टाकलं, अस पोलिसांना सांगितल आहे. झालं असं की, लोकेशने सोसायटीच्या वॉचमनला आम्हाला रुग्णवाहिका पाहिजे म्हणून फोन केला. त्यामुळे वॉचमनला संशय आला. त्याने सोसायटीच्या सदस्यांना याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर सोसायटीचे सदस्य प्रमोद बनोरिया यांच्या चौथ्या मजल्यावरील घरी पोहोचले. सदस्यांनी घरी जाऊन पाहिलं असता त्यांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली.

ADVERTISEMENT

कल्याण: वासनांध प्रियकर-प्रेयसी, अल्पवयीन भाऊ-बहिणीवर प्रियकर-प्रेयसीकडून वारंवार बलात्कार

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र तपासाअंती या प्रकरणातील तथ्य व काय घटना घडली हे समोर येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे असून, त्यांच्या चौकशीनंतर सत्य समोर येईल, असं एसीपी उमेश माने पाटील यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT