कल्याण : पोलिसांवर हल्ले करवणारा मास्टरमाईंड हैदर इराणी अटकेत
देशभरात १०० पेक्षा अधिक चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात आरोपी असलेला आणि पोलिसांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याचा सूत्रधार हैदर इराणीला अटक करण्यात कल्याण पोलिसांना यश आलंय. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. वर्षभरात कल्याण पोलिसांनी इराणी गँगच्या २५ जणांना पकडलं होतं, परंतू हैदर इराणी पोलिसांच्या हातात लागत नव्हता. त्यामुळे हैदरच्या अटकेमुळे कल्याण पोलिसांचं मोठं कौतुक होताना […]
ADVERTISEMENT

देशभरात १०० पेक्षा अधिक चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात आरोपी असलेला आणि पोलिसांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याचा सूत्रधार हैदर इराणीला अटक करण्यात कल्याण पोलिसांना यश आलंय. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. वर्षभरात कल्याण पोलिसांनी इराणी गँगच्या २५ जणांना पकडलं होतं, परंतू हैदर इराणी पोलिसांच्या हातात लागत नव्हता. त्यामुळे हैदरच्या अटकेमुळे कल्याण पोलिसांचं मोठं कौतुक होताना दिसत आहे.
अनेकदा आरोपीला पकडायला गेलेल्या पोलीस पथकावर हैदर इराणी आपल्या माणसांकरवी दगडफेक करवायचा. आंबिवली परिसरातील इराणी वस्तीवर छापा मारत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हैदरविरोधात कल्याण-डोंबिवली परिसरात मोबाईल आणि चेन स्नॅचिंगचे २५ गुन्हे दाखल आहेत. याव्यतिरीक्त मुंबईतही त्याच्याविरोधात ३० गुन्हे दाखल आहेत.
२ मार्च २०२१ मध्ये इराणी वस्तीत कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर दडफेक झाली होती. याचा फायदा घेत हैदर इराणीने पोलिसांच्या ताब्यातील आपल्या सहकाऱ्याला पळवलं होतं. याचं सीसीटीव्ही फु़टेजही समोर आलं होतं. अखेरीस खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धडाकेबाज कारवाई करत इराणीला बेड्या ठोकल्या आहेत.