Pune By Poll : पोटनिवडणुकीत ‘३’ चेहरे ‘मविआ’च्या २ जागांचं गणित चुकवणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Kasba Peth And Chinchwad By poll : पुणे: कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये रंगत वाढली आहे. कसबा पेठेतून भाजपच्या हेमंत रासने यांनी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवलं आहे. चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपच्यावतीने तिकिट देण्यात आलं आहे. महाविकास आघाडीमध्ये चिंचवडची जागा राष्ट्रवादीकडे असून नाना काटे यांच्यावर राष्ट्रवादीने विश्वास दाखवत त्यांना तिकिट दिलं आहे. (Kasba Peth And Chinchwad By poll Balasaheb Dabhekar, Ramesh Bagwe, Rahul Kalate file nomination)

ADVERTISEMENT

अर्ज भरल्यानंतर आता या सर्वांनी प्रत्यक्ष प्रचारालाही सुरुवात केली आहे. दोन्ही बाजूंनी तगडे उमेदवार मैदानात असल्यामुळे निवडणुकीची चुरशीची होईल असं बोललं जातं आहे. पण एका बाजूला ही परिस्थिती असली तरीही दोन्ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्यामुळे भाजपसाठी निवडणूक काहीशी सोपी झाल्याचंही बोललं जात आहे. १० फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्यामुळे अवघ्या दोन दिवसांमध्ये बंड थंड करण्याचं आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आहे.

Kasba Peth By Poll : हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर; कोणाची किती संपत्ती?

हे वाचलं का?

कोणी केली बंडखोरी? महाविकास आघाडीपुढे कसं आहे आव्हान?

निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय असल्याचं म्हणतं कसब्यातून काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज भरला आहे. तर काँग्रेस नेते रमेश बागवे उमेदवारी न मिळाल्याने नाराज असल्याचीही चर्चा आहे. रवींद्र धंगेकर यांना निवडून आणायचं असल्यासं दाभेकर यांची बंडखोरी थोपविण्याचं आणि बागवे यांची नाराजी दुर करण्याचं आव्हान काँग्रेसपुढे आहे.

चिंचवडमध्ये शिवसेना (UBT) कडून इच्छुक उमेदवार राहुल कलाटे यांनी जागा राष्ट्रवादीला सुटल्याने अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीपुढे बंडखोरांना थोपविण्याचे आव्हान आहे. राहुल कलाटे यांनी २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून दोन नंबरची मतं घेतली होती. तर २०१९ मध्ये अपक्ष उभं राहुन एक लाखांपेक्षा जास्त मतं घेतली होती.

ADVERTISEMENT

Kasba Bypoll: ठाकरेंचा विश्वासू ते काँग्रसेचा उमेदवार, कोण आहेत रविंद्र धंगेकर?

ADVERTISEMENT

यामुळेच कसबा पेठ पोटनिवडणुकीचे काँग्रेस प्रभारी यांनी संपर्क साधून दाभेकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दाभेकर निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. तर कलाटे यांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादीचे निवडणूक प्रभारी आणि आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेतला. पण त्यात त्यांना अद्याप यश आलेलं नाही. त्यांनी मंगळवारी अर्ज भरताना मोठं शक्तिप्रदर्शनही केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT