Kasaba Peth bypoll बिनविरोध? : काँग्रेसचा चेंडू भाजपच्या कोर्टात
भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे अनुक्रमे चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीने या दोन्ही जागांवरुन तयारी सुरु केल्याचं चित्र असल्यानं निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. महाविकास आघाडीतून कसबा पेठची जागा काँग्रेस लढविणार आहे तर चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढविणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर भोर-वेल्हाचे […]
ADVERTISEMENT
भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे अनुक्रमे चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीने या दोन्ही जागांवरुन तयारी सुरु केल्याचं चित्र असल्यानं निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. महाविकास आघाडीतून कसबा पेठची जागा काँग्रेस लढविणार आहे तर चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढविणार असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
या पार्श्वभूमीवर भोर-वेल्हाचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंची कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी पक्षाच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करू अशी भूमिका भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं. बिनविरोधाचा प्रस्ताव तुमच्यापर्यंत आल्यावर काय भूमिका राहणार? यावर त्यांनी उत्तर दिलं.
पटोले म्हणाले, महाराष्ट्राची एक परंपरा राहिली आहे. संबंधित लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास, ती निवडणूक बिनविरोध करण्याच काम काँग्रेसनं केलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीत उभी राहिली होती. त्यावेळी ती निवडणूक बिनविरोध केली होती.
हे वाचलं का?
मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंढरपूर, देगलुर, कोल्हापूर याठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत संबंधित कुटूंबातील व्यक्तीला भाजपने विरोध करण्याचं काम केले आहे. त्यामुळे आता भाजपचा नेमका प्रस्ताव काय येतो, त्यावर आपण बोलू. अजून तरी प्रस्ताव आलेला नाही, असं नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसमधून ही पाच नावं चर्चेत :
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, बाळासाहेब दाभेकर, संगीता तिवारी, कमल व्यवहारे, रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत. तसंच या उमेदवारांनी नाना पटोले यांनी भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. या पाचही उमेदवारांची नावं दिल्लीला पाठविण्यात येणार असून लवकरच अंतिम नावावर शिक्कामोर्तब होईल असं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
‘कसबा पेठ’ मधून भाजपची ही नाव चर्चेत :
दरम्यान, कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपमधूनही काही नावं पुढं येत आहेत. यात दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक हे इच्छुक असल्याची माहिती आहे. याशिवाय कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, भाजप खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे, माजी नगरसेवक अशोक येनपुरे यांचीही नाव चर्चेत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT