जम्मू-काश्मीर: काश्मिरी पंडितावर अतिरेक्यांचा गोळीबार, वेळेत उपचार मिळाल्याने वाचला जीव
मिळालेल्या माहितीनुसार, सोनू कुमार हे आपल्या मेडीकल दुकानात बसले होते. यावेळी दोन अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गेल्या काही वर्षांपासून सोनू कुमार आपल्या परिवारासोबत या भागात मेडीकल दुकान चालवत होते. हा हल्ला झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी परिसरात सुरक्षा वाढवली आहे. गेल्या २४ तासांत जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी सात जणांवर हल्ला केला आहे. ज्यात पुलवामा येथे चार परप्रांतीय मजूरांसह श्रीनगरमध्ये […]
ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, सोनू कुमार हे आपल्या मेडीकल दुकानात बसले होते. यावेळी दोन अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गेल्या काही वर्षांपासून सोनू कुमार आपल्या परिवारासोबत या भागात मेडीकल दुकान चालवत होते. हा हल्ला झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी परिसरात सुरक्षा वाढवली आहे.
गेल्या २४ तासांत जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी सात जणांवर हल्ला केला आहे. ज्यात पुलवामा येथे चार परप्रांतीय मजूरांसह श्रीनगरमध्ये दोन सीआरपीएफच्या जवानांवरही हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आता सोनू कुमार यांचीही भर पडली आहे. पुलवामा भागात अतिरेक्यांनी हल्ला करुन दोन कामगारांना जखमी केलं आहे. हे दोन्ही कामगार बिहारचे रहिवासी आहेत.
बिहारमधील कामगारांवर हल्ला झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच पंजाबमधील कामगारांना अतिरेक्यांनी लक्ष बनवलं. त्यामुळे या भागात सीआरपीएफ सह पोलीस यंत्रणांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.