Katrina Kaif : कतरिनाच्या मंगळसूत्राने वेधलं सगळ्यांचं लक्ष, किंमत ऐकून थक्क व्हाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. 9 डिसेंबरला ही जोडी राजस्थानमध्ये विवाहबद्ध झाली. माधवपूर या ठिकाणी असलेल्या सिक्स सेंसेस फोर्टमध्ये या दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. नववधूच्या वेशात कतरिना अगदी शोभून दिसत होती. एक वेगळंच तेज तिच्या चेहऱ्यावर आलं होतं. लाल रंगाचा लेहंगा, केसात गजरा, हातात बांगड्या आणि भांगात भरलेल्या कुंकवाने कतरिनाच्या सौंदर्यात नवे रंग भरले. सब्यासाचीने या दोघांसाठी लग्नाचे कपडे डिझाईन केले होते. कतरिनाची ज्वेलरीही सब्यासाचीच्या हेरिटेज कलेक्शनमधली होती.

ADVERTISEMENT

लग्न होऊन 24 तास उलटून गेले आहेत. मात्र तरीही या लग्नाची चर्चा कायम आहे. कतरिनाने तिच्या हातात खास निळा हिरा असलेली रिंग घातली होती. त्याकडेही सगळ्यांचं लक्ष गेलं होतं. आता चर्चा होते आहे ती मंगळसूत्राची. होय कतरिना कैफने गळ्यात घातलेलं मंगळसूत्रही खास आहे. तुम्ही ते नीट लक्षपूर्वक पाहिलं का? हा फोटो पाहा.. म्हणजे तुम्हाला हे मंगळसूत्र किती खास आहे ते लक्षात येईल.

हे वाचलं का?

या फोटोत नीट बघितलं तर लक्षात येतं की कतरिनाने डायमंड म्हणजेच हिऱ्याचं मंगळसूत्र घातलं आहे. हे मंगळसूत्र सब्यासाची बंगाल टायगर कलेक्शन आहे. काळे मोती, गोल्डन रंगाचे मोती आणि दोन हिरे असं या मंगळसूत्राचं स्वरूप आहे. कतरिनाने तिच्या लग्नात घातलेलं हे मंगळसूत्र आता चर्चेचा विषय ठरलं आहे. कतरिनाची ही इच्छा होती की तिच्या लग्नात ती सुंदर आणि वेगळी दिसली पाहिजे. तसंच घडलं कतरिना तिच्या लग्नाच्या वेशात अत्यंत सुंदर दिसत होती.

बॉलिवूड लाईफने दिलेल्या बातमीनुसार या मंगळसूत्राची किंमत पाच लाख रूपयांच्या घरात आहे. लग्नासारख्या प्रसंगी कतरिनाने घातलेलं हे मंगळसूत्र आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विकी आणि कतरिना या दोघांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. विकी आणि कतरिनाने नवा फ्लॅट 60 महिन्यांसाठी भाडे तत्त्वावर घेतला आहे. जुहूमध्ये ही इमारत आहे. विकी आणि कतरिना यांच्या घरासाठीचं डिपॉझिट पावणेदोन कोटी आहे. तर घराचं प्रतिमहिना भाडं हे 8 लाख रूपये आहे असंही समजतं आहे.

ADVERTISEMENT

KatrinaVicky : कतरिना आणि विकीच्या लग्नाचे खास फोटो पाहिले का?

ADVERTISEMENT

कतरिनाची एंगेजमेंट रिंग

कतरिना आणि विकी यांनी आपलं रिलेशन अगदी गुपित ठेवलं होतं. या दोघांच्या नात्याची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा होती. पण तरीही ते त्यांनी कधीच आपल्या प्रेमाचं प्रदर्शन केलं नाही. काही दिवसांपूर्वी कतरिनाच्या एंगेजमेंटच्या बातम्याही आल्या होत्या, मात्र तिने त्याचा इन्कार केला होता. पण आता कतरिना आणि विकी हे थेट लग्नाच्या बेडीत अडकले आहे. अशावेळी कतरिनाच्या हातात एंगेजमेंट रिंगही पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT