कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा ! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा 1773 कोटी 56 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर केला. कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ किंवा दरवाढ करण्यात आलेली नाही. तसेच या अर्थसंकल्पात आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ न केल्याने कल्याण-डोंबिवलीतील रहिवाश्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ADVERTISEMENT

शहरातील सामान्य नागरिकांना याच शहरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, गोरगरीब विद्यार्थ्यांमध्ये क्रीडागुण विकसीत व्हावेत, शहर स्वच्छता, शहराचं सौंदर्यीकरण आणि मूलभूत सुविधांवर आपण अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेने आज आपला अर्थसंकल्प सादर केला. आयुक्त सूर्यवंशी हे महापालिकेचे प्रशासक आहेत. त्यामुळे त्यांनी हा अर्थसंकल्प सादर करून आपल्या अधिकारातच अर्थसंकल्पाला तात्काळ मंजूरीही दिली. केडीएमसीच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही चर्चेविना अर्थसंकल्प मंजूर झाला आहे.

हे वाचलं का?

कल्याण डोंबिवलीतील नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा वाढवण्यासह शहर सौंदर्यीकरण, आरोग्य, क्रिडा, स्वछता आणि ई-गव्हर्नन्स यासारख्या अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांना अर्थसंकल्पात मिळालेलं स्थान हे या अर्थसंकल्पाचे ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. मात्र त्यात तरतूद केलेल्या किती गोष्टी प्रत्यक्षात उतरतात यावर त्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे. यंदाच्या बजेटमध्ये नागरिकांवर कोणतीही करदरवाढ लादलेली नाही. मात्र येत्या वर्षातही आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं.

या अर्थसंकल्पात शहरातील उद्याने विकसीत करण्यावरही भर देण्यात आला आहे. खेळाडूंकरीता मैदाने विकसीत करण्यावरही भर देण्यात आला आहे. तसेच शहरातील पाच तलावाचा विकास करण्यात येणार असून महापालिका क्षेत्रातील भटकी /पाळीव जनावरे यांचे अंतिम संस्कारकरिता कोणतीही व्यवस्था नाही म्हणून प्राण्यांकरिता स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात येणार आहे. यासह अनेक महत्वाच्या विषयांवर यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT