अपहरण झालेल्या मुलाची सुरतमधून सुटका; 3 राज्यांतील पोलिसांनी लावला 75 तासांत छडा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

डोंबिवली : येथून अपहरण झालेल्या 12 वर्षांच्या मुलाची सुरतमधून सुटका करण्यात आली. चार दिवसांपूर्वी दीड कोटीच्या खंडणीसाठी या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या गुन्ह्यात ५ आरोपींनाही अत्यंत थरारक पद्धतीने अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फरहशहा फिरोजशहा रफाई, प्रिंस कुमार सिंग, शाहीन मेहतर, फरहिंद सिंग, नाझिया रफाई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर हत्या, गुजरातमध्ये दारूची तस्करी आणि घरफोडी असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

याबाबत पालकांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, त्यांनी मुलाला सकाळी ८ वाजता क्लासला सोडले होते. १० वाजता क्लास सुटल्यानंतर सोसायटीच्या जवळचं सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या भागातून मुलाचं अपहरण केलं. अपहरण केल्याच्या दिवशी आरोपींनी एक कोटीच्या खंडणीसाठी पालकांना फोन केला. त्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधून सर्व प्रकाराची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी पुन्हा दीड कोटी रुपये खंडणीचा फोन आला.

हे वाचलं का?

दरम्यान, अपहरण केल्यानंतर आरोपी अनेक राज्यात फिरत होते. तपासादरम्यान, नाकाबंदीत पकडले जाऊ नये यासाठी मुख्य मार्ग सोडून गावातील अंतरंग मार्गातून ये-जा करत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर या आरोपींचा ठिकाणा सुरतमध्ये असल्याचं समजलं.

त्यानुसार तपासाची चक्र फिरवून महाराष्ट्रातील नाशिक, ठाणे, पालघर जिल्ह्यातील पोलिसांच्या मदतीने दादरा-नगर हवेलीतील सिल्वासा पोलीस आणि गुजरात पोलिसांच्या सहकार्याने 200 पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची 20 पथकं बनवण्यात आली. अखेरीस 75 तासानंतर पोलिसांनी 2 पुरुष आरोपींसह 3 महिलां आरोपींना बेड्या ठोकल्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT