‘खरा संजय अंधारी कोण?’, सोमय्यांचा किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप; फडणवीसांकडे केली तक्रार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

kirit somaiya News : ठाकरे गटातील नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसत आहे. भाजपने किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकरांवर फेरफार करून एसआरएचे गाळे हडप केल्याचा आरोप केलाय. या प्रकरणात सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केलीये.

ADVERTISEMENT

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन किशोरी पेडणेकरांविरुद्ध गंभीर आरोप केलेत. किरीट सोमय्या म्हणाले, “ठाकरे गटातील नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी गरीब झोपडपट्टीवासीयांचे एसआरएचे गाळे हडप केले. इतकंच नाही, तर बोगस बनावट कागदपत्रांच्या आधारे गोमाता जनता एसआरएचे गाळे स्वतःच्या किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. कंपनीच्या नावे करण्याचा गुन्हा केला आहे”, असा दावा सोमय्यांनी केलाय.

किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप करताना किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर, त्यांची कंपनी किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. आणि एसआरएचे गाळा/सदनिका धारक संजय महादेव अंधारी यांच्यात झालेल्या लिव्ह अॅण्ड लायसन्सच्या कराराची प्रतीही पत्रकार परिषदेत दाखवल्या.

हे वाचलं का?

किरीट सोमय्या म्हणाले, “कराराप्रमाणे संजय महादेव अंधारी ज्यांना एसआरए योजनेतंर्गत गोमाता जनता एसआरए सोसायटीतील बिल्डिंग क्रमांक १ मधील ४ नंबरच्या मजल्यावर गाळा देण्यात आला होता. संजय अंधारी हे अनेक वर्षांपासून झोपडपट्टीत राहतात, असं दाखवण्यात आलं होतं.”

“एसआरएने जी कागदपत्रे दिली आहेत, त्यात संजय अंधारी यांचा फोटो आणि स्वाक्षरी आहे. ६ जुलै २०१७ रोजी संजय अंधारी यांनी ही जागा किशोरी पेडणेकर यांच्या किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रा.लि. कपंनीला दिली. त्याचं करारपत्र सरकारकडे आहे”, अशी माहिती किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ADVERTISEMENT

किशोरी पेडणेकरांनी स्वतःच्या भावाच्या नावाने फेरफार केला -किरीट सोमय्या

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, “मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर स्वतःच्या भावाच्या नावाने अशा प्रकारे फेरफार करू शकतात ही धक्कादायक बाब आहे. संजय महादेव अंधारींच्या नावाने किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. कंपनीसोबत जो करार झाला आहे, त्यात संजय अंधारी यांची सही किशोरी पेडणेकरांचे एकेकाळचे भाऊ सुनील कदम यांनी केली आहे, असं दिसतं”, असा आरोप सोमय्यांनी केलाय.

ADVERTISEMENT

किशोरी पेडणेकरांनी बेनामी पद्धतीने गाळे हडप केले – किरीट सोमय्यांचा आरोप

“करारामध्ये संजय महादेव अंधारीचा जो फोटो दाखवण्यात आलाय आहे, तो फोटोही सुनील कदम यांचा आहे. सुनील कदम हे किशोरी पेडणेकरांचे भाऊ आहेत, असे माजी महापौरांनी अनेकवेळा सांगितलंय. सुनील कदम संजय अंधारी बनून हा केला म्हणजे किशोरी पेडणेकर यांनी एसआरएचे गाळे बेनामी पद्धतीने हडप केले हे सिद्ध होत आहे”, असा दावा किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकरांवर आरोप करताना केलाय.

देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार

किशोरी पेडणेकरांनी एसआरएचे गाळे हडप केल्याचा आरोप केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला असून, याप्रकरणाकडे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही लक्ष वेधलं आहे. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्या फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करणार पत्र सोमय्यांनी फडणवीसांना दिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT