संजय राऊत यांच्या विरोधात किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा नील सोमय्याही उपस्थित होता.

ADVERTISEMENT

किरीट सोमय्या हल्ला : सरकारबरोबर पोलिसांनाही आमची ताकद दाखवून देऊ; फडणवीस संतापले

काय म्हटलं आहे मेधा सोमय्या यांनी तक्रारीत?

हे वाचलं का?

मी डॉ. मेधा किरीट सोमय्या Flat क्रमांक ९/c ७०१ नीलम नगर, फेज २, गव्हाणपाडा रोड मुलुंड पूर्व या ठिकाणी राहते. मी गेल्या २० वर्षांपासून मुंबईतल्या माटुंगा या ठिकाणी असलेल्या रूईया महाविद्यालयात ऑर्गेनिक केमिस्ट्री हा विषय शिकवते. मी जन शिक्षण संस्था, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स या संस्थांशी जोडले गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच मी लोकसभेच्या माजी स्पीकर श्रीमती सुमित्रा महाजन यांच्यावर पुस्तकही लिहिलं आहे.

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एप्रिल महिन्यात एक आरोप केला होता. ज्यामध्ये मीर भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा टॉयलेट घोटाळा झाला आहे असा आरोप केला होता. विक्रांत घोटाळ्यापासून टॉयलेटपर्यंत यांनी घोटाळे केले आहेत. युवा प्रतिष्ठान नावाची जी काही संस्था चालवत होते त्यात किरीट सोमय्या त्यांची पत्नी आणि कुटुंबीय आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. याच आरोपांच्या विरोधात किरीट सोमय्यांच्या पत्नी आणि मुलगा पोलीस ठाण्यात पोहचले आहेत.

ADVERTISEMENT

मेधा सोमय्या यांनी तक्रारीत म्हटले आहे की, राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांच्या प्रतिमेला आणि प्रतिष्ठेला तडा गेला आहे. म्हणून त्यांनी ही मागणी केली आहे आणि आयपीसी कलम ५०३ (प्रतिष्ठेला धोका), ५०६ (गुन्हेगारी धमकीसाठी शिक्षा) आणि ५०९ (महिलेचा विनयभंग) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. दुसरीकडे ही सगळी प्रक्रिया समोर आल्यानंतर संजय राऊत यांनीही त्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

माझ्या विरोधात कितीही खोट्या तक्रारी करा, आगामी काळात विक्रांत घोटाळा आणि टॉयलेट घोटाळा यापेक्षा मोठा घोटाळा आगामी काळात समोर येणार आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. विक्रांत घोटाळ्यातील एक आरोपी कुठे जाऊन खोट्या तक्रारी करत असेल तर तसं करायला हरकत नाही. युवक प्रतिष्ठानच्या नावे जो घोटाळा झाला आणि होतो आहे त्यात कोट्यवधी रूपये प्रतिष्ठानच्या खात्यावर आले आहेत आणि त्याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT