कोल्हापूर : मोक्काअंतर्गत कारवाईची धमकी, १० लाखांची लाच स्विकारताना दोन कॉन्स्टेबल जाळ्यात
जुन्या स्पोर्ट्स बाईकची विक्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन मोक्काअंतर्गत कारवाईची धमकी देत लाच मागणाऱ्या दोन कॉन्स्टेबल्सना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. विजय कारंडे आणि किरण गावडे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं असून १० लाखांची लाच स्विकारताना त्यांना अटक करण्यात आली आहे. अँटी करप्शनचे अधिकारी कारवाई करत असतानाही हे दोन आरोपी […]
ADVERTISEMENT

जुन्या स्पोर्ट्स बाईकची विक्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन मोक्काअंतर्गत कारवाईची धमकी देत लाच मागणाऱ्या दोन कॉन्स्टेबल्सना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. विजय कारंडे आणि किरण गावडे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं असून १० लाखांची लाच स्विकारताना त्यांना अटक करण्यात आली आहे.
अँटी करप्शनचे अधिकारी कारवाई करत असतानाही हे दोन आरोपी कॉन्स्टेबल पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. यानंतर या दोघांना पुन्हा पकडून चोप देण्यात आला. शाहुपुरी पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे कोल्हापूर पोलीस दलाची मोठी बदनामी झाली आहे.
भाजीवाल्यांकडून पैसे घेतानाचा Video व्हायरल, माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रतिभा नगर येथे राहणारे वकील दत्तात्रेय जाधव यांचा मुलगा संदेश हा घराजवळच स्वतःचं गॅरेज चालवतो. संदेशचा स्पोर्ट्स बाईक विक्रीचाही व्यवसाय आहे. नुकतच त्यांन पनवेल इथून एक जुनी स्पोर्ट्स बाइक खरेदी केली होती.स्क्रॅप करण्यासाठी आणलेली ही दुचाकी त्यान गॅरेजमध्ये लावली होती.दरम्यान याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील हवालदार विजय कारंडे आणि पोलीस नाईक किरण गावडे या दोघांना माहिती मिळाली. त्यांनी १८ जानेवारी रोजी संदेश जाधव याला उचलून चौकशीसाठी ताब्यात घेतलं.