किरीट सोमय्या पुन्हा राष्ट्रवादीला कात्रीत पकडणार?, कोल्हापूरनंतर मोर्चा पारनेरकडे
पारनेर: कोल्हपूरमधील साखर कारखान्यांच्याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आत आपला मोर्चा नगर जिल्ह्यातील पारनेरकडे वळवला आहे. पारनेर साखर कारखाना विक्री घोटाळा चोकशी प्रकरणी कृती समितीच्या वतीने थेट ईडीकडे चोकशीची मागणी करण्यात आली आहे. कारखान्याच्या शेतकरी सभासदांशी व इतर प्रश्नांबाबात चर्चा करण्यासाठी उद्या (23 सप्टेंबर) माजी खासदार किरीट सोमय्या पारनेर […]
ADVERTISEMENT
पारनेर: कोल्हपूरमधील साखर कारखान्यांच्याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आत आपला मोर्चा नगर जिल्ह्यातील पारनेरकडे वळवला आहे.
ADVERTISEMENT
पारनेर साखर कारखाना विक्री घोटाळा चोकशी प्रकरणी कृती समितीच्या वतीने थेट ईडीकडे चोकशीची मागणी करण्यात आली आहे. कारखान्याच्या शेतकरी सभासदांशी व इतर प्रश्नांबाबात चर्चा करण्यासाठी उद्या (23 सप्टेंबर) माजी खासदार किरीट सोमय्या पारनेर येथील क्रांती शुगर साखर कारखाना येथे येणार असल्याचे कारखाना बचाव कृती समितीचे रामदास घावटे यांनी सांगितले आहे.
पारनेर येथील शेतकरी सदस्य, कामगार, ग्रामंस्थाशी संवाद साधणार त्यानंतर 3 वाजता पत्रकारांशी संवादही साधणार आहेत
हे वाचलं का?
काय आहे प्रकरण
पारनेर साखर कारखाना विकत घेणारी खाजगी क्रांती शुगर अॅण्ड पावर लिमिटेड या कंपनीकडे कोणतीही मालमत्ता व भांडवल नसताना सुमारे 32 कोटी रूपयांना कारखाना विकत घेतला.
ADVERTISEMENT
राज्य सहकारी बँकेने पारनेर साखर कारखाना विक्रीची बोगस प्रक्रिया राबवली होती. पारनेर साखर कारखाना विकत घेण्यासाठी वापरलेले 23 कोटी रूपये उद्योगजक अतुल चोरडीया व अशोक चोरडीया यांच्याकडून उसने घेण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. तर उर्वरित 9 कोटी रूपये अक्षर लॅण्ड डेव्हलपर्स यांच्याकडून घेण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासातून ही बाब उघड झालेली आहे. साखर कारखाना विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चोकशी करून दोषींवर कारवाईची मागणी कारखाना बचाव समितीने ईडी कडे केली आहे.
किरीट सोमय्या यांचीही भेट घेतली त्यानुसार पारनेर साखर कारखान्याला ते भेट देऊन माहिती जाणून घेणार असून किरीट सोमय्या ईडीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे कारखाना बचाव समितीचे रामदास घावटे यांनी सांगितले आहे.
तूर्तास हा साखर कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार विजय नवले यांच्याकडे आहे.
किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा, शिवसेना मंत्री अनिल परबांकडून हायकोर्टात याचिका
किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफांवर केले होते गंभीर आरोप
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते. सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे माध्यमांना दाखवत हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध ईडीकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं होतं.
‘हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. इतकंच नाही तर बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्याद्वारे मनी लाँड्रिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं, याचे माझ्याकडे 2700 पानी पुरावे आहेत. हे पुरावे आयकर विभागाला दिले आहेत. सीआरएम सिस्टम प्रा. लि. प्रविण अग्रवाल म्हणून हिचा ऑपरेटर आहे. या कंपनीमधून हसन मुश्रीफांच्या मुलाने दोन कोटींचं कर्ज घेतल्याचं दाखवण्यात आलं आहे.’ असं आरोप करुन सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT