ओव्हरहेड वायर तुटल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; बावनकुळे अडकले, सामंतांचा दौरा रद्द
पूर्णपणे विद्युतीकरण करण्यात आलेल्या कोकण रेल्वेची वाहतूक मध्यरात्रीपासून विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्यानं वेगवेगळ्या स्थानकांवर गाड्या खोळंबल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील विस्कळीत झालेल्या वाहतुकीचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना फटका बसला. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दौरा रद्द केल्याची माहिती आहे. ओव्हर हेड वायर तुटल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक मध्यरात्रीपासून (25 नोव्हेंबर) विस्कळीत झाली आहे. […]
ADVERTISEMENT

पूर्णपणे विद्युतीकरण करण्यात आलेल्या कोकण रेल्वेची वाहतूक मध्यरात्रीपासून विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्यानं वेगवेगळ्या स्थानकांवर गाड्या खोळंबल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील विस्कळीत झालेल्या वाहतुकीचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना फटका बसला. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दौरा रद्द केल्याची माहिती आहे.
ओव्हर हेड वायर तुटल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक मध्यरात्रीपासून (25 नोव्हेंबर) विस्कळीत झाली आहे. दिवानखवटी ते विन्हेरे दरम्यान ही घटना घडली आहे. त्यामुळे अनेक गाड्या विविध स्टेशनवरती खोळंबून आहेत.
काही गाड्या उशिराने धावत आहेत. रेल्वे गाड्या दोन ते चार तास उशिराने धावत आहेत. कोकणकन्या, तुतारी, मंगलोर एक्सप्रेस, मडगाव एक्सप्रेस अशा अनेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांना बसला कोकण रेल्वेच्या वाहतुकीचा फटका
ओव्हर हेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाचा फटका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील बसला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज रत्नागिरी दौरा आहे.









