लखीमपूर खेरी हिंसाचार : एसआयटीने संशयित आरोपींची छायाचित्रं केली प्रसिद्ध

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्यात आल्याची घटना घडली होती. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेचा तपास उत्तर प्रदेश सरकारने एसआयटीकडे सोपवला असून, एसआयटीने सहा संशयित आरोपींची छायाचित्रे आज प्रसिद्ध केली आहेत. या आरोपींची माहिती देणाऱ्यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून बक्षिस दिलं जाणार आहे.

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी परिसरात निदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांना थार गाडीने उडवण्यात आलं होतं. शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचार चार शेतकऱ्यांसह एकूण 8 जणांचा मृत्यू झाला होता.

या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. सर्वोच्च न्यायालयानेही घटनेची दखल घेत उत्तर प्रदेश सरकारला फटकारत तातडीने कारवाई आणि आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उत्तर सरकारने एसआयटी स्थापन केली असून, तपास केला जात आहे.

हे वाचलं का?

Lakhimpur kheri violence : शेतकरी की पक्षाचे कार्यकर्ते… जीव गमावणारे ते 8 लोक कोण होते?

एसआयटीला या प्रकरणाचा तपास करत असताना काही व्हिडीओ आणि फोटो मिळाले असून, त्याआधारे एसआयटीने संशयित आरोपींचा शोध सुरू केला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसआयटीने आज काही संशयित आरोपीचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.

ADVERTISEMENT

संशयित आरोपींचं नाव आणि पत्ता यासह इतर माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संशयित आरोपींची माहिती देणारांची नावं एसआयटीकडून गोपनीय ठेवली जाणार असून, त्यांना योग्य बक्षिस दिले जाणार आहे. एसआयटीने सहा फोटो प्रकाशित केले आहेत.

ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक

या प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांकडून आशिष मिश्राची चौकशी केली जात असून, त्याला कोठडीत ठेवण्यात आलेलं आहे.

लखीमपूर खीरी : शेतकऱ्यांना गाडीने उडवतानाचा ‘तो’ व्हिडीओ आला समोर

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शेतकऱ्यांना चिरडण्यात आल्याचं समोर आलं होतं. घटनेत थार गाडी निदर्शनं करत असलेल्या शेतकऱ्यांना मागून येऊन उडवताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT