राज ठाकरेंकडून नियमांचा भंग?, गृहमंत्री वळसे-पाटलांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक
राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पोलीस महासंचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्याकडून पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचा भंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गृह विभागाने औरंगाबाद पोलिसांकडे यासंदर्भातील अहवाल मागवला आहे. ३ मे पर्यंत भोंगे उतरवा नाहीतर ४ मेपासून काहीही ऐकून घेणार नाही, असं भडक […]
ADVERTISEMENT

राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पोलीस महासंचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्याकडून पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचा भंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गृह विभागाने औरंगाबाद पोलिसांकडे यासंदर्भातील अहवाल मागवला आहे.
३ मे पर्यंत भोंगे उतरवा नाहीतर ४ मेपासून काहीही ऐकून घेणार नाही, असं भडक विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलची चर्चा सुरू आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात आज गृहमंत्र्यांनी बैठक बोलावली असून, या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
Raj Thackeray: ‘एकदा काय ते होऊन जाऊ द्या!’, अजान सुरु होताच राज ठाकरे भडकले!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे सभा झाली. या सभेला औरंगाबाद पोलिसांनी सशर्त परवानगी दिली होती. दरम्यान, राज ठाकरेंकडून नियमांचं उल्लंघन झालंय का, अशी माहिती गृह विभागाने आता औरंगाबाद पोलिसांकडे मागितली आहे. जर नियमभंग झालेले असेल, तर योग्य कारवाई केली जाईल, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.









