whatsapp चॅटवर प्रेमाच्या गप्पा, Video कॉलनंतर सुरू व्हायचं…
गाझियाबाद: सोशल मीडियाच्या माध्यमातून Video कॉलिंग करून ब्लॅकमेल करणाऱ्या एका व्यक्तीला गाझियाबाद पोलिसांनी अटक केली आहे. हा व्यक्ती देशातील विविध राज्यातील लोकांना आपलं शिकार बनवत होता. नूह मेवात येथील रहिवासी असलेल्या आरोपी झाकीर याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने सांगितले की, तो तरुणीच्या नावाने फेसबुकवर बनावट आयडी बनवत असे. फेसबुकवर लोकांशी मैत्री करून तो चॅटच्या […]
ADVERTISEMENT

गाझियाबाद: सोशल मीडियाच्या माध्यमातून Video कॉलिंग करून ब्लॅकमेल करणाऱ्या एका व्यक्तीला गाझियाबाद पोलिसांनी अटक केली आहे. हा व्यक्ती देशातील विविध राज्यातील लोकांना आपलं शिकार बनवत होता. नूह मेवात येथील रहिवासी असलेल्या आरोपी झाकीर याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने सांगितले की, तो तरुणीच्या नावाने फेसबुकवर बनावट आयडी बनवत असे. फेसबुकवर लोकांशी मैत्री करून तो चॅटच्या माध्यमातून त्यांच्याकडून व्हॉट्सअॅप नंबर घेत असे.
आरोपी झाकीर बनावट आयडीवरून सिम घेत असे. यामध्ये त्याला रायपूरमध्ये राहणारा त्याच्या बहिणीचा नवरा मुफीक हा देखील मदत करत होता. याच आधारे तो लोकांशी अनोळखी लोकांशी चॅट करायचा. समोरची व्यक्ती पूर्णपणे आपल्या जाळ्यात अडकली आहे, असं जेव्हा त्याला वाटायचं तेव्हा तो समोरच्या व्यक्तीला व्हिडिओ कॉलवर बोलण्यास प्रवृत्त करायचा. समोरच्या व्यक्तीला देखील असं वाटायचं की, तो एखाद्या मुलीशीच बोलत आहे. त्यामुळे ते देखील व्हिडिओ कॉलसाठी तयार व्हायचे.
व्हिडिओ कॉल सुरू करण्यापूर्वी, हे लोकं दुसऱ्या फोनमध्ये अश्लील व्हिडिओ प्ले करायचे आणि ज्या फोनवरून व्हिडिओ कॉल सुरु असायचा त्या फोनसमोर अश्लील क्लिप सुरु ठेवायचे.
व्हिडिओ कॉल सुरू होताच, समोरच्या व्यक्तीला एखादा अश्लील व्हिडिओ दिसायचा. याचवेळी ही टोळी स्क्रीन रेकॉर्डिंग आणि स्क्रीन शॉट घ्यायचे. हे लोक तीन ते चार वेळा असे व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करायचे. यानंतर दुसऱ्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून ते गुन्हे शाखेचे डीसीपी, डेप्युटी एसपी, अधिकारी विक्रम राठोर किंवा अन्य कोणत्याही नावाने पोलिस असल्याची बतावणी करून, तुम्ही कोणत्याही मुलीसोबत ऑनलाइन गैरवर्तन केले आहे, अशी धमकी द्यायला सुरुवात करायचे.