LPG Gas Leakage : कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळतीची घटना, 58 रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दक्षिण मुंबई परिसरातलं महत्वाचं रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या कस्तुरबा रुग्णालयात आज LPS Gas Leakage ची घटना घडली आहे. गॅस गळतीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ या घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाच्या ८ गाड्या या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम करत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या रुग्णालयातील ५८ रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं, ज्यापैकी २० रुग्ण हे कोरोनाबाधित आहेत.

ADVERTISEMENT

चिंचपोकळी परिसरातील आर्थर रोड रस्त्यावर कस्तुरबा रुग्णालय आहे. सकाळी साडेअकरा वाजल्याच्या दरम्यान गॅस गळतीची घटना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. ज्या ठिकाणी ही गॅस गळती होत होती तिकडे फारसे रुग्ण नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं बोललं जात आहे. या घटनेची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी रवाना झाल्या असून त्यांनी या प्रकरणाची माहिती घेत कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आदेश दिले आहेत.

या गॅस गळतीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. सुरक्षेचा उपाय म्हणून रुग्णांसह हा भाग रिकामा करण्यात आला. अग्नीशमन दलाने यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. ही गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याचा तपास सध्या अधिकारी करत आहेत.

हे वाचलं का?

मुंबई CSMT स्टेशनवर बॉम्बच्या अफवेने खळबळ

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT