LPG cylinder price : महागाईचा आणखी एक दणका! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांची होरपळ सुरू आहे. पेट्रोल-डिझेलसह अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून, आता पुन्हा एक तडाखा बसला आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी महागले आहेत. यापूर्वी मार्चमध्ये ५० रुपयांनी वाढ झाली होती.

गेल्या काही महिन्यांपासून महागाईच्या झळा तीव्र झाल्या असून, पेट्रोल-डिझेलसह अनेक वस्तूंचे भाव सातत्याने वाढ आहेत. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे दरही वाढत असून, आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे.

तेल कंपन्यांनी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवले आहेत. त्यामुळे १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ९९९.५० रुपये म्हणजेच एक हजारांच्या घरात जाऊन पोहोचली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याच महिन्याच्या एक तारखेला तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजीच्या दरात १०२.५० रुपयांची वाढ केली होती. १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने त्याचे दर दिल्लीत २,३५५.५० रुपयांवर पोहोचलेले आहेत.

पाच किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमतही ६५५ रुपये आहे. एक एप्रिल रोजी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीही २५० रुपयांनी वाढवली होती.

ADVERTISEMENT

पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर (Petrol-Diesel Prices Updates)

ADVERTISEMENT

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दरात चढ उतार सुरूच आहेत. असं असलं तरी देशातील पेट्रोल-डिझेलचे दरात आज कोणतीही वाढ झालेली नाही. तेल वितरक कंपन्यांकडून इंधनाच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर १०५.४१ रुपये आहेत, तर डिझेल लिटरमागे ९६.६७ रुपये आहेत. आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी १२०.५१ रुपये मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर डिझेलही १०४.७७ रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत.

६ एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाले होते. तेव्हापासून दर स्थिर आहेत. तेल कंपन्याकडून मार्च-एप्रिलमध्ये इंधनांच्या दरात मोठी वाढ करण्यात आली. २२ मार्चपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास सुरूवात झाली होती.

२२ मार्चपासून ६ एप्रिलपर्यंत पेट्रोलच्या दरात लिटरमागे ८० पैसे, ८० पैसे, ८० पैसे, ८० पैसे, ५० पैसे, ३० पैसे, ८० पैसे, ८० पैसे, ८० पैसे, ८० पैसे, ८० पैसे, ४० पैसे, ८० पैसे आणि ८० पैसे अशी वाढ करण्यात आली होती.

वाढती महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेचं पाऊल…

पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. याचं ओझ सर्वसामान्यांवर पडत असून, आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जावरील व्याजदर वाढवले आहेत. आरबीआयने रेपो रेट वाढवले आहेत. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता महागलेल्या कर्जांमुळे महागाई रोखली जाणार का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT